अकोला : सद्गुणांमुळे दशानन रावण गावाचे दैवत, सांगोळा येथील २१० वर्षांची अनोखी परंपरा, दसऱ्यानिमित्त लंकेश्वराची होते विशेष पूजा | Ravan is worshiped on the occasion of Dussehra in Sangola amy 95 | Loksatta

अकोला : सद्गुणांमुळे दशानन रावण गावाचे दैवत, सांगोळा येथील २१० वर्षांची अनोखी परंपरा, दसऱ्यानिमित्त लंकेश्वराची होते विशेष पूजा

भारतात श्रीरामाचा शत्रू म्हणून खलनायकत्व मिळालेल्या रावणाची हेटाळणी होते.

अकोला : सद्गुणांमुळे दशानन रावण गावाचे दैवत, सांगोळा येथील २१० वर्षांची अनोखी परंपरा, दसऱ्यानिमित्त लंकेश्वराची होते विशेष पूजा
सांगोळा येथील २१० वर्षांची अनोखी परंपरेनुसार दसऱ्यानिमित्त लंकेश्वराची होते विशेष पूजा

भारतात श्रीरामाचा शत्रू म्हणून खलनायकत्व मिळालेल्या रावणाची हेटाळणी होते. परंतु, एका ठिकाणी रावणाची सद्गुणांमुळे पूजा होते हे सांगितले तर खरे वाटणार नाही. मात्र, हे सत्य असून, अकोला जिल्ह्यातील सांगोळा नावाच्या गावी रावणाची सद्गुणांमुळे पूजा केली जाते. या प्रथेला तब्बल २१० वर्षांची प्राचीन परंपरा लाभली आहे.वाईट ते सोडावे आणि चांगले ते घ्यावे, अशी शिकवण आपल्या संस्कृतीने दिली आहे. दशानन रावणात काही चांगले गुणही होते. याच गुणांच्या समुच्चयाने त्याची पूजा अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात करण्यात येते. बाळापूर तालुक्यातील वाडेगावनजीक हे गाव आहे.

हेही वाचा >>> वाशिम : शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून ५० ‘एसटी बसेस’ जाणार , प्रवाशांना मात्र मन:स्ताप

गावाच्या पूर्वेस एका ओट्यावर रावणाची पुरातन मूर्ती आहे. उघड्यावर ही मूर्ती वसलेली आहे. हे मंदिर या गावाचे वैशिष्ट्य तसेच श्रद्धस्थानही आहे. रावण या गावाचे दैवत असून ही मूर्ती स्थापन केल्यापासून गावावरील संकटे दूर झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.रावणाच्या स्वभावातील काही दुर्गुण बाजूला सारले तर त्याच्यातील अनेक गुणांचे दर्शन होते. तपस्वी, बुद्धीमान, शक्तिशाली, वेदाभ्यासी आदी गुणांमुळेच सांगोळ्यात रावणाची पूजा केली जाते. २१० वर्षांपूर्वी या भागात वास्तव्य असणाऱ्या एका ऋषीने गावाच्या पश्चिम असलेल्या जंगलात तपश्चर्या केली होती. त्यांच्याच प्रेरणेने गावात अनेक धार्मिक उपक्रमही होते. आजही त्यातील काही उपक्रम सुरू आहेत. ऋषी ब्रह्मालीन झाल्यानंतर एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती बनवण्याचे काम सोपवण्यात आले. पण, त्याच्या हातून दशानन रावणाची मूर्ती घडली. दहा तोंडे, काचा बसवलेले २० डोळे, सर्व आयुधे असलेले २० हात, अशी विराट मूर्ती या मूर्तिकाराने घडवली. दहा फाटे असलेले सिंदीचे झाड आणि अवचित घडलेली ही लंकेश्वराची मूर्ती, हा योगायोग श्रद्धाळू ग्रामस्थांनी हेरला आणि गावात लंकेश्वर स्थिरावले. भक्तिभावाने रावणाची पूजा केली जाते. दसऱ्यानिमित्त सर्वत्र रावणाचे दहन होत असतांना या गावात मात्र विशेष पुजा होते. गावात रावणाचे भव्य मंदिर बांधले जावे, अशी आता ग्रामस्थांची इच्छा आहे.

अकोला जिल्ह्यातील सांगोळा येथे सद्गुणांमुळे रावणाची पूजा करण्यात येते. या ठिकाणचे मंदिर राज्यातील एकमेव असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विदर्भातील काही आदिवासी भागात देखील रावणाला पूजले जाते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बुलढाणा : पांगरीचा झेंडू परराज्यात, दसऱ्यानिमित्त १०० क्विंटलची निर्यात!

संबंधित बातम्या

ओबीसींना तत्काळ आरक्षण देण्याचा अधिकार मला नाही; हंसराज अहिर
“हे फक्त गडकरीच करू शकतात, तो काँग्रेसचा नेता असूनही…”, नाना पाटेकरांचं नागपुरात वक्तव्य
नागपूर: फडणवीस यांनी शब्द पाळला, राज्यातील ३५ हजार अधिसंख्य कर्मचाऱ्यांना दिलासा
नागपूर : वकील होण्याचे होते युवकाचे स्वप्न, पालकांच्या आग्रहामुळे अभियांत्रिकीला घेतला प्रवेश; नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल
नागपूर: प्राथमिक फेरीत रंगमंचावर व्यक्तिरेखा जिवंत करणारा अभिनय

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: कमी पटसंख्येच्या शाळा बंद नाही करण्यात येणार नाही; शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची स्पष्टोक्ती
Exclusive Video : गोष्ट पुण्याची भाग- ५८ : हजारो वर्षांपूर्वी भारतात आलेल्या बेनेइस्राइल समाजाचे प्रार्थनालय
तुमच्या आडनावाचा महाराष्ट्राशी संबंध आहे का? अनुपम खेर यांनी उत्तर देत सांगितला ‘खेर’चा इतिहास, म्हणाले, “गाढव…”
IND vs BAN 1st ODI: भारतासमोर आज बांगलादेशचे आव्हान, जाणून घ्या पहिली वनडे कधी आणि कुठे बघायला मिळणार
धारावी पुनर्विकास प्रकल्प हे धारावीकरांसाठी स्वप्न नव्हे, मृगजळच!