खाटा वाढविण्यासह अन्य सुविधांबाबत निर्देश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी मेयो आणि मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि अन्य अधिकाऱ्यांशी   चर्चा करून रुग्णालयात खाटा वाढविण्यासह अन्य सुविधांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. दोन्ही रुग्णालयात दाखल  रुग्णांचे प्रमाण, उपलब्ध सुविधा या तुलनेत प्रशासनाकडून वा सामाजिक क्षेत्रातून काय मदत करता येईल, यासंदर्भातील तपशीलवार माहिती त्यांनी घेतली.

फडणवीस यांनी प्रारंभी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पदाधिकाऱ्यांची भेट घेत आणखी २०० खाटा वाढविण्यासंदर्भात नियोजन कसे करता येईल, याबाबतही सविस्तर चर्चा केली. आयएमएने केवळ तज्ज्ञ मनुष्यबळ द्यावे, बाकी सुविधा तसेच इतर मनुष्यबळ महापालिका देणार असल्याचे सांगितले. डॉक्टरांना या काळात येत असलेल्या अडचणी, सरकारकडून त्यांच्या अपेक्षा याबाबत सुद्धा आयएमएने माहिती दिली. त्यानंतर गांधीनगर,  इंदिरा गांधी रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली.   यावेळी आमदार प्रवीण दटके, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, डॉ. मंजुषा गिरी, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. काटे आणि डॉ. निखाडे , मेयोचे अधिष्ठाता डॉ. केवडीया, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. पी. पी. जोशी, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. लांजेवार उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Review of hospitals in nagpur city by devendra fadnavis zws
First published on: 18-04-2021 at 10:11 IST