नागपूर: ज्योतिष नऊ ग्रह, बारा राशी, सत्तावीस नक्षत्र आणि बारा भाव यावर टिकलेली आहे. सर्व भविष्यफळाचे मूळ आधार याचे आपआपसात संयोग आहे. वैदिक काळात आपल्या ऋषी मुनींनी ४ वेदांची (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद) रचना केली होती. यामध्ये शिक्षा, कल्प, व्याकरण, छंद, निरुक्त सोबतच ज्योतिष ही येते. ज्योतिष शास्त्र एक वैदिक कालीन विद्या आहे, ज्यामध्ये ग्रहांची चाल आणि प्रभावाने मनुष्याच्या भविष्यफळाचे अध्ययन केले जाते.

हेही वाचा >>> १६ जुलैपासून ‘या’ राशींचे नशीब पालटणार? बुधादित्य राजयोग बनताच प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता

Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार

तुम्हालाही हे सगळे शिकून घ्यायचे असेल तर कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकच्या वेदांग ज्योतिष विभागाच्यावतीने १२ जुलैपासून दुपारी ३ ते ४:३० पर्यंत ७ दिवसांकरिता ‘नि:शुल्क ज्योतिष शास्त्र प्रशिक्षण वर्ग’ आयोजित केले आहे. एलआयटी कॉम्प्लेक्स, मोरभवन जवळ हे वर्ग होणार आहेत. या प्रशिक्षण वर्गात ज्योतिष शास्त्राच्या बाबतीत माहिती दिली जाईल. ज्योतिष शिकण्याच्या या पाठ्यक्रमात तुम्हाला खूप सहज आणि सरळ भाषेत ज्योतिष ज्ञान शिकवले जाईल.

हेही वाचा >>> Chanakya Niti : चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी विद्यार्थ्यांना नियमित यशासाठी ठरू शकतात फायदेशीर

वैदिक ज्योतिषमध्ये सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी आणि राहू-केतूला ग्रहांची मान्यता दिली गेली आहे. हे सर्व ग्रह संक्रमण करते वेळी प्रत्येक राशींमध्ये काही वेळेसाठी थांबतात आणि याच्याच प्रभावाच्या विश्लेषणाने राशीफळ तयार होते. ज्योतिषामध्ये जन्म कुंडली किंवा जन्म पत्रिका नेहमीच प्रत्येक व्यक्तीसाठी उत्सुकतेचा विषय राहिला आहे. कारण जन्म कुंडलीमध्ये मनुष्याच्या जीवनाचा सार असतो. ‘नि:शुल्क ज्योतिष शास्त्र प्रशिक्षण वर्ग’ यामध्ये ज्योतिषीय प्राथमिक ज्ञान दिले आहे; तुम्ही कमी वेळात चांगल्या प्रकारे हे ज्ञान प्राप्त करू शकता.