नागपूर : आरटीई अंतर्गत शाळेत राखीव जागेवर मुलांना पैसे घेऊन प्रवेश मिळवून देणाऱ्या शाहिद शरीफचा आर्थिक व्यवहार सांभाळणारी महिला रुखसार शेख चांद शेख ऊर्फ रुपाली प्रीतम धमगाये (३५) आणि फरार झालेला पालक प्रशांत हेडावू यालाही पोलिसांनी अटक केली.

रुखसार ऊर्फ रुपाली धमगायेच्या अटकेनंतर शाहिद शरीफच्या अनेक बाबींचा उलगडा होणार आहे. सदर पोलिसांनी आरटीई प्रवेश घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार शाहिद शरीफ याच्या धंतोली येथील कार्यालयात काम करणारी महिला रुखसार ऊर्फ रुपाली ही पोलिसांच्या ‘टार्गेट’वर होती. तिला सापळा रचून जरीपटक्यातून अटक केली आहे.

Tiger, gypsy, Tadoba, gypsy drivers,
ताडोबात जिप्सी चालकांनी घेरले वाघाला! व्यवस्थापन हादरले, पर्यटक…
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
nitin gadkari sanjay raut narendra modi amit shah
“…म्हणून देवेंद्र फडणवीस नाईलाजाने प्रचारात उतरले”, गडकरींचा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा; मोदी-शाहांना केलं लक्ष्य!
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाची आई कॅमेरासमोर ढसाढसा रडली, म्हणाली; “प्लीज..”
AAP MP Swati Maliwal and YouTuber Dhruv Rathee
ध्रुव राठी आणि ‘आप’वर स्वाती मालिवाल यांचा मोठा आरोप; म्हणाल्या, “बलात्कार आणि जीवे मारण्याची..”

हेही वाचा – ताडोबात जिप्सी चालकांनी घेरले वाघाला! व्यवस्थापन हादरले, पर्यटक…

रुखसार ही शाहिद शरीफचे आर्थिक व्यवहार सांभाळत होती. आरटीई प्रवेशासाठी येणाऱ्या पालकांची नावे नोंदवून घेणे, त्यांच्याशी फोनवर संपर्क साधणे आदी कामे ती करायची. आपण कुठेही पकडले जाऊ नये, या भीतीने आरटीई प्रवेशासाठी पालकांनी पाठविलेली रक्कम शाहिद शरीफ थेट आपल्या खात्यात स्वीकारत नव्हता. ही रक्कम रुखसारच्या बँक खात्यात जमा व्हायची. त्यानंतर रुखसार रक्कम काढून शाहिद शरीफला रोख स्वरुपात देत होती.

रुखसारला सदर पोलिसांनी अटक केल्यानंतर शाहिद शरीफच्या गोरखधंद्याबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शाहिद शरीफ आरटीई प्रवेशासाठी कोणकोणत्या गैरमार्गाचा अवलंब करायचा? यात आणखी किती आरोपींचा समावेश आहे? या सर्व बाबींचा खुलासा अटकेत असलेल्या रुखसारकडून होणार आहे. रुपाली धमगाये हिने प्रेमविवाह केला असून ती शाहिद शरीफच्या फसवणूक करणाऱ्या टोळीतील सदस्य झाली. रुपाली हिच्या बँक खात्यातून लाखो रुपयांचे व्यवहार झाले आहेत. तसेच रुपाली हिच्यासह तिच्या नातेवाईकांच्याही बँक खात्यात लाखो रुपये ट्रान्सफर झाल्याची माहिती समोर आली.

हेही वाचा – नितीन गडकरींनाही ताडोबातील वाघांची भुरळ; एक, दोन नाही तर आठ वाघांचे दर्शन

पगार लाखभर अन् आरटीईतून प्रवेश

आरोपी प्रशांत हेडावू हा आदित्य बिरला कंपनीत व्यवस्थापक पदावर नोकरी करतो. त्याला जवळपास एक ते दीड लाख रुपये पगार आहे. तरीही मुलाला आरटीई अंतर्गत शाळेत निःशुल्क प्रवेश मिळवून द्यायचा होता. त्याने शाहिद शरीफला काही पैसे दिले आणि बनावट कागदपत्र तयार करून एका नामांकित शाळेत प्रवेश मिळवून दिला. त्याने बनावट कागदपत्रे शाहिद शरीफच्या कार्यालयातून बनविले होते, हे उघडकीस आले.