पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून काढून टाकल्यानंतर समाज माध्यमातून १० रुपयांची नाणी रद्द झाल्याची जोरदार अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे घराघरातील बालगोपलांचे ‘पिग्मी बँक’ पालकांनी फोडली आणि १० रुपयांचे नाण्यांचा बाजारात खुळखुळाट सुरू झाला आहे. दरम्यान, अजूनही अफवांवर विश्वास कायम असणारे छोटे दुकानदार, भाजी विक्रेते हे नाणे स्वीकारण्यास तयार नाहीत.
[jwplayer vtVpMCjf]
निश्चलनीकरणाच्या दुसऱ्या दिवशी यासंदर्भातील पोस्ट फिरू लागली. त्यानंतर काही दुकानदारांनी ती स्वीकारण्यास नकार दिला. परंतु त्याचा परिणाम असा झाला. मुलांचे खाऊचे पैसे जमा करण्याचे डब्यांनी मोकळा श्वास घेतला. हजारो नाणी बाजारात आली आहेत. गेल्या तीन चार-वर्षांत एखाद-दुसरा दिसणारे १० रुपयांचे नाणी आज बाजारात मोठय़ा प्रमाणात दिसू लागले आहे. यासंदर्भात शिक्षिका वैशाली भुजाडे म्हणाल्या, १० रुपयांचे नाणे चलनातून काढून टाकल्याचे कळले. माझ्या मुलीच्या ‘पिग्मी बँक’मध्ये ५०० रुपयांचे नाणी होती. त्यामुळे मुलीची ‘पिग्मी बँके’तील सगळे दहा रुपयांचे नाणे वेगवेगळ्या ठिकाणी खर्च केली.
अफवावर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी
चलनातून १० रुपयाचे नाणे रद्द झाले नाही. दैनंदिन व्यवहारात १० रुपयाची नाणी चलनात आहेत. यासंदर्भात सुरू असलेल्या अफवावर जनतेने विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे. चलनात १० रुपयांसह सर्व नाणी किरकोळ दुकानदार व इतर सर्वानीच स्वीकारावीत. १० रुपयांचे नाणी कुणीही परत करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी कुर्वे यांनी केले.
दोन प्रकारच्या अफवा
* १० रुपयांच्या नाण्याबद्दल दोन प्रकारची अफवा आहे. हे नाणे चलनातून बाद करण्यात आली आहे. दुसरी म्हणजे दहा रुपयांचे नाणे बनावट आले आहेत.
* दहा आकडा मधील वर्तुळाबाहेर आला तर खरे नाणे आणि आकडा नाण्याच्या मधील वर्तुळात असेल तर ते नाणे खोटे, असा अप्रचार जोरात सुरू आहे.
[jwplayer V4vR1CQw]