नागपूर : संत तुकाराम महाराज यांची बदनामी करणाऱ्या बागेश्वर बुवाचा जाहीर निषेध, सचिन राजूरकर यांचे वक्तव्य | Sachin Rajurkar Protest Bageshwar maharaj controversial statement against Sant Tukaram Maharaj Rbt 74 ysh 95 | Loksatta

नागपूर : संत तुकाराम महाराज यांची बदनामी करणाऱ्या बागेश्वर बुवाचा जाहीर निषेध, सचिन राजूरकर यांचे विधान

धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी त्यांच्या प्रवचनातून संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची चित्रफीत नुकतीच सार्वत्रिक झाली आहे.

Dhirendra krishna maharaj controversial comment on sant tukaram maharaj (1)
संत तुकाराम, धीरेंद्र कृष्ण महाराज (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नागपूर : दिव्यशक्तीचा आणि चमत्कार करण्याचा दावा करणारे बागेश्वर धामचे वादग्रस्त धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होऊ लागली आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी त्यांच्या प्रवचनातून संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची चित्रफीत नुकतीच सार्वत्रिक झाली आहे. याविषयी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सरचिटणीस सचिन राजूरकर म्हणाले, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल भोंदू महाराज बागेश्वर सारखे लोक बोलतात.

हेही वाचा >>> “तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी मारहाण करायची”, बागेश्वर महाराजांचं वादग्रस्त विधान; देहू विश्वस्त म्हणाले…

हेही वाचा >>> Video : धीरेंद्र कृष्ण महाराजांचे संत तुकाराम महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान; म्हणाले “त्यांची पत्नी…”

हे आपण थांबवणार आहोत की नाही? कुठे तरी हे थांबले पाहिजे. नक्की काय अजेंडा आहे या लोकांचा? हा २५-२६ वर्षांचा बाबा याला संत तुकारामांचे किती अभंग पाठ असतील? हा बागेश्वर म्हणतो त्यांना बायको मारायची म्हणून ते देव देव करायला लागले, असे कुठल्या पुस्तकात लिहिले आहे? याचे उत्तर या बुवा आणि त्याचे समर्थन करणाऱ्या त्याच्या भक्तमंडळींनी द्यावे. संत तुकाराम महाराज आणि त्यांची पत्नी यांच्याबद्दल अशी बेताल वक्तव्ये करणाऱ्या पळपुट्या महाराजाचा जाहीर निषेध करीत आहोत, असे राजूरकर म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 16:59 IST
Next Story
“तो मी नव्हेच!” व्हायरल ऑडिओ क्लिपवर धीरज लिंगाडे यांचा पलटवार, म्हणाले “हे प्रकरण…”