शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासंदर्भात नागपूरचे आमदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर निशाणा साधला. या टीकेला राऊत यांनी जाहीर सभेमध्ये फडणवीसांना टोला लगावला आहे. “नागपूरच्या मातीमध्ये एक वेगळेपण आहे. ते नागपूरला वारंवार आले, तर त्यांना थोडी सुबुद्धी येईल”, असं फडणवीस यांनी राऊत यांच्या दौऱ्याबद्दल म्हटलं होतं. पण याच मुद्द्यावरुन राऊत यांनी शाब्दिक चिमटा काढत फडणवीस यांना सुबुद्धी न आल्याने त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं असा टोला लगावलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूरमधील जाहीर सभेमध्ये बोलताना संजय राऊत यांनी, “दुर्देवाने तुम्हाला सुबुद्धी आली नाही आणि म्हणून तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं,” असं उत्तर फडणवीस यांच्या टीकेला दिलं. “जर तुम्हाला त्यावेळी सुबुद्धी आली असती की, शिवसेना हा आपला मित्र पक्ष आहे. शिवसेना हा आपला हिंदुत्ववादी पक्ष आहे. आपण त्या मैत्रीच्या नात्याने राहिलं पाहिजे ही सुबुद्धी आली असती तर आज आपण कदाचित मुख्यमंत्री असता. पण तुम्हाला दुर्बुद्धी सुचली आणि आम्हाला सुबुद्धीची अक्कल तुम्ही देताय,” असा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावलाय.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams ex cm devendra fadnavis in nagpur scsg
First published on: 22-04-2022 at 07:50 IST