अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून ते कर्करोगाने आजारी होते. त्‍यांच्‍यावर पुणे येथील रुग्‍णालयात उपचार सुरू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. दिलीप मालखेडे यांची ११ सप्‍टेंबर २०२१ रोजी कुलगुरूपदी नियुक्‍ती करण्‍यात आली होती, त्‍यावेळी ते पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात यांत्रिकी विषयाचे प्राध्‍यापक होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अभ्यासक्रमांना पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धत ‘सीबीसीएस’ (चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम) लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्‍यांच्‍याच नेतृत्‍वात घेण्‍यात आला होता. रोजगाराभिमुख अभ्‍यासक्रम तयार करण्‍यासाठी त्‍यांनी पुढाकार घेतला होता. त्‍यांच्‍या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्‍यवरांनी शोकसंवेदना व्‍यक्‍त केल्‍या आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sant gadgebaba amravati university vice chancellor dr dilip malkhede passed away mma 73 ysh
First published on: 28-01-2023 at 09:04 IST