अमरावती: छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) व महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) यांच्याकडून विविध स्पर्धा परिक्षांचे मोफत प्रशिक्षणासह अर्थसहाय्य दिले जाते. विद्यार्थ्यांनी एकाच संस्थेचा लाभ घेणे बंधनकारक असताना अनेक विद्यार्थी दोन्ही संस्थांचा लाभ घेतात. दुहेरी लाभ घेणाऱ्यांविरोधात ‘सारथी’ने कठोर भूमिका घेतली आहे. अशा १३० विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करत त्यांना अपात्र ठरविण्‍यात आले आहे.

संधीचा फायदा घेत विद्यार्थी दोन्ही संस्थेकडे अर्ज करतात. एमपीएससी राज्यसेवा २०२३ अर्थसहाय्यासाठी अर्ज करणाऱ्या १३० विद्यार्थ्‍यांचे अर्जच ‘सारथी’ने अपात्र ठरविले आहेत.

jee main result
अरे व्वा! जेईई मेन परीक्षेत तब्बल ५६ विद्यार्थ्यांनी मिळवले १०० गुण, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचाही समावेश!
jee mains result 2024 marathi news
JEE Main Result 2024: जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, ५६ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण, नागपूरच्या निलकृष्ण गजरेने मारली बाजी…
teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”

हेही वाचा… यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, अशा आहेत तारखा…

सारथी -महाज्योती या राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थेकडून लाभ घेण्याचा मोह कायम आहे. एकाच लाभासाठी दोन्ही संस्थांकडे विद्यार्थ्‍यांकडून अर्ज केले जाताहेत. लाभार्थी विद्यार्थ्यांच्या माहितीच्या घेवाण देवाणीसाठी महाज्योतीने समन्वयक नियुक्त केले आहेत.