scorecardresearch

भाजपला धक्का देत होले काँग्रेसमध्ये

सोमवारी क्वार्टर परिसरातील उद्यानात हा पक्षप्रवेशाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

congress
संग्रहित छायाचित्र

पटोले म्हणतात, ‘आगे आगे देखो होता है क्या’

नागपूर : ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर यांनी भाजपला रामराम केला असून काँग्रेसचा हात धरत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जोरदार धक्का दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत होले यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आगे आगे देखो होता है क्या, अशी बोलकी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली.

सोमवारी क्वार्टर परिसरातील उद्यानात हा पक्षप्रवेशाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नाना पटोले म्हणाले, ही तर केवळ सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या.. यापुढे भाजपमधील मोठमोठय़ा नेत्यांचे काँग्रेस प्रवेश झाल्याचे नागपूरकारांना बघायला मिळतील. भाजपने नागपूरकरांना दिलेली आश्वासने तर पूर्ण केलीच नाहीत, पण त्यांच्याच कार्यकर्त्यांना दिलेले शब्ददेखील पाळले नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते आता त्यांच्यावर नाराज आहेत. हा रोष महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बघायला मिळणार आहे.

आरोपांमागची वस्तुस्थिती तपासावी लागेल

पालकमंत्री नितीन राऊत आणि त्यांचा मुलगा कुणाल यांचे मकोकाच्या आरोपीसोबत संबंध आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्वाला धोटे यांनी केला. याबाबत विचारले असता, ज्या पद्धतीने आरोप लावले गेले त्यानुसार वस्तुस्थिती तपासून बघावी लागेल. मगच त्यावर काही प्रतिक्रिया देता येईल.  आजकाल  कुणीही डिजिटल कारागिरी करून छायाचित्र तयार करू शकतो. आरोप लावणाऱ्यांनी तर मुख्यमंत्र्यांचे १९ बंगले असल्याचेही सांगितले होते. मग ते बंगले गायब झाले, असे सांगत त्यांनी नाव न घेता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना टोला लगावला.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Senior councilors and former deputy mayor join congress zws

ताज्या बातम्या