विजय वडेट्टीवार यांचा आरोप
सार्वजनिक बांधकाम विभागाचा १५०० कोटींचा निधी राज्य मंत्रिमंडळातील ११ ज्येष्ठ मंत्र्यांनी पळवून ते स्वत:च्या विधानसभा मतदारसंघात विकास कामे करीत असल्याचा घणाघाती आरोप कॉंग्रेसचे विधिमंडळ उपनेते व ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केला.
राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारला उद्या, ३१ ऑक्टोबरला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर वडेट्टीवार यांनी वष्रेभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची पाटी कोरी राहिल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांचा मंत्रिमंडळावर वचक राहिलेला नाही. परिणामी राज्यातील ११ ज्येष्ठ मंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा १५०० कोटींचा निधी परस्पर पळवून त्यांनी स्वत:च्या विधानसभा मतदारसंघात विकास कामे सुरू केली आहेत. हे गंभीर असतांनाही मुख्यमंत्री त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मंत्रीच निधीची पळवापळवी करीत असतील तर आमदारांना विकास निधी कधी मिळणार? राज्य सरकारने उत्पादनाचे स्त्रोत स्वत:हून बंद केल्यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झालेली आहे. एलबीटी रद्द केल्याने ३ हजार कोटी, पथकरामुळे ८५० कोटी, तर दारूबंदीमुळे शेकडो कोटींचे नुकसान झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Oct 2015 रोजी प्रकाशित
सार्वजनिक बांधकामाचे १५०० कोटी ११ ज्येष्ठ मंत्र्यांनी पळवले!
मुख्यमंत्र्यांचा मंत्रिमंडळावर वचक राहिलेला नाही.
Written by रत्नाकर पवार

First published on: 31-10-2015 at 04:01 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior minister evolved in pwd scam said vijay vadettivar