चंद्रपूर: २० दिवसांपूर्वी शोध लागलेल्या “२०२३ एफएम” नावाचा २०० मीटर व्यासाचा लघुग्रह उद्या, ६ एप्रिलला पृथ्वीजवळून जाणार आहे. हा लघुग्रह चंद्राच्या कक्षेबाहेरून जाणार असल्याने चंद्राच्या गुरूत्वकर्षांमुळे लघुग्रहाची दिशा भरकटण्याची चिन्हे आहेत. मात्र, तो पृथ्वीच्या दिशेने येणार नसल्याचे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

हेही वाचा… अंतराळातून कोसळलेले रिंग व सिलिंडर चीनच्या उपग्रहाचे अवशेष; इस्रो, चंद्रा ऑब्जर्वेटरी संस्थेचा दावा, सरकारला अहवाल सादर

pune ranks among the forgetful passengers
विसरभोळ्या प्रवाशांमध्ये पुणेकर देशात पाचव्या स्थानी! जाणून घ्या कोणत्या वस्तू विसरतात…
meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
Pune records highest temperature in April in eleven years
पुण्यात अकरा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद; तापमानाचा आलेख कसा चढा राहिला?
March 2024, March 2024 Records Hottest Temperatures, March 2024 Records Hottest in 175 Years, hottes march 2024 globally, Global Average Temperatures Up by 1.35°C, heat, summer march, summer season
यंदाचा मार्च आजवरचा सर्वांत उष्ण; पश्चिमी झंझावाताचा भारताला दिलासा

हेही वाचा… ‘समृद्धी’वर अतिवेगाचे दोन बळी; आई-वडिलांचा मृत्यू, मुलाची मृत्यूशी झुंज..

१६ मार्चला ‘२०२३ एफएम’ नावाच्या लघुग्रहाचा शोध लागला. हा लघुग्रह २०० मीटर व्यासाचा असून गेल्या काही वर्षात पृथ्वीजवळून जाणाऱ्या लघुग्रहांपैकी सर्वांत मोठा लघुग्रह आहे. ‘२०२३ एफएम’ लघुग्रह १६ किलोमीटर प्रतिसेकंद वेगाने जात असून तो पृथ्वीजवळून जाणार आहे. सदरचा लघुग्रह हा पहिल्यांदाच ६ एप्रिलला पृथ्वीजवळून जाणार आहे. त्यामुळे हा कुतूहलाचा विषय ठरत आहे. पृथ्वी व चंद्र आपल्या गुरुत्वाकर्षणाद्वारे लघुग्रहाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करू शकते. मात्र, सध्या तरी हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. जर हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर दोन किलोमीटर परिसरात हानी होईल. मात्र, ‘२०२३ एफएम’ हा लघुग्रह पृथ्वीकडे येणार नसल्याचे प्रा. चोपणे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.