यवतमाळ : राज्यात मराठा आंदोलन पेटले असताना मराठाबहुल उमरखेड तालुक्यात अज्ञात तरुणांनी राज्य परिवहन विभागाची बस पेट्रोल ओतून जाळल्याने खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील गोजेगाव नजीकच्या पैनगंगा पुलावर घडली. बसमधील ७३ प्रवासी सुखरूप आहे.

नांदेड आगाराची नांदेड-नागपूर बस रात्री ११ वाजता पैनगंगा पुलाजवळ पोहोचताच मागाहून आलेल्या एका मोटारसायकलस्वाराने ही बस थांबवली. त्याच्यामागून परत पाच ते सहा लोक आले. त्यांनी बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविले. त्यानंतर या अज्ञात लोकांनी पेट्रोल टाकून बस पेटवून दिली.
या घटनेत बसचे (क्र. एमएच २०- जीसी ३१८९) ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले. बस जाळणारे कोण होते, त्यांनी हा प्रकार का केला, याचा शोध उमरखेड पोलीस घेत आहेत.

wild elephant created havoc in the district gadchiroli three women seriously injured in attack
रानटी हत्तीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू ; दोघी गंभीर
uday samant buldhana marathi news
“महायुती बुलढाण्यासह राज्यात ४५ जागा जिंकणार”, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा; तुपकरांवर टीकास्त्र
Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार
Satej Patil criticize Sanjay Mandlik says MPs do not meet even for a simple letter
साध्या पत्रासाठीही खासदार भेटत नाहीत; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका

हेही वाचा – काँग्रेसमधील गटबाजीवर वरिष्ठांचे मौन पुत्रप्रेमातून ?

हेही वाचा – गडचिरोली : शेतातील गाळ उपसाच्या नावाखाली कोट्यवधींची वाळू तस्करी, महसूल विभागाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष

या बसवर चालक बी.डी. नाईकवाडे, तर वाहक एस.एन. वाघमारे हे होते. घटनास्थळी यवतमाळ आणि नांदेड एसटी विभाग नियंत्रकांसह पोलिसांनी भेट दिली. याप्रकरणी अद्याप कोणत्याही आरोपीची ओळख पटली नाही. हा प्रकार मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने घडला की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहे.