अमरावती : कर्मचारी निवड आयोगाकडून (स्‍टाफ सिलेक्‍शन कमिशन) सन २०२४-२५ मध्‍ये घेण्‍यात येणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक प्रसिद्ध करण्‍यात आले आहे. या सर्व परीक्षा संगणकाच्‍या माध्‍यमातून घेतल्‍या जाणार आहेत. पात्र व इच्‍छुक उमेदवारांसाठी सविस्‍तर वेळापत्रक आयोगाच्‍या अधिकृत संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहे. प्रत्‍येक पदासाठी स्‍वतंत्र अधिसूचना काढण्‍यात आली आहे. त्‍यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

असे आहे वेळापत्रक : एप्रिल-मे २०२४ : ग्रेड ‘सी’ स्टेनोग्राफर . लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्‍ह परीक्षा, जीएसए/एलडीसी ग्रेड लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्‍ह परीक्षा, एसएसए/ यूडीसी ग्रेड लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटिव परीक्षा, निवड पोस्ट परीक्षा फेज (१२)

UPSC Releases Exam Schedule for 2025, Registration Dates and Exam Details Announced, upsc exams 2025, upsc exms 2025 exam schedule, Union Public Service Commission, Competitive Examination, marathi news, students, maharashtra students
पुढील वर्षीच्या विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक UPSC कडून जाहीर; नागरी सेवा परीक्षा कधी होणार?
Dissatisfaction among students over delay in Maharashtra Public Service Commission exams results interviews
‘एमपीएससी’च्या परीक्षा, निकालांची प्रतीक्षाच; अनेक परीक्षांचे अभ्यासक्रम प्रलंबित, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा
set exam date marathi news, set exam 7th april marathi news
‘सेट’ परीक्षा ७ एप्रिल रोजी, मुंबईतील २८ केंद्रांवर १४ हजार ४२६ परीक्षार्थी परीक्षा देणार

हेही वाचा – नागपूर : ‘सिस्टीक फायब्रोसिस’चे निदान मुलांच्या घामातून शक्य; दिल्ली एम्सकडून मदत मिळणार

हेही वाचा – मुंबई उच्च न्यायालयाचे ‘टेलिग्राम चॅनल’; कारवाईबाबतची माहिती प्रसारित केली जाणार

मे-जून २०२४ : दिल्ली आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा, कनिष्ठ अभियंता परीक्षा

जून-जुलै २०२४ : एकत्रित उच्च . माध्यमिक स्तर परीक्षा, मल्टी टास्किंग (नॉनटेक्निकल) परीक्षा

सप्टेंबर २०२४ : संयुक्त पदवी स्तर परीक्षा

ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२४: स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’ आणि ‘डी’ परीक्षा, कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक आणि वरिष्ठ हिंदी अनुवादक परीक्षा

डिसेंबर २०२४ – जाने. २०२५ : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कॉन्स्टेबल आणि आसाम रायफल्सच्या रायफल मॅन परीक्षा.