लोकसत्ता टीम

नागपूर : निवडणूक प्रक्रियेत प्रशासकीय कामाच्यादृष्टीने बहुतांश अधिकारी-कर्मचारी हे कर्तव्यनिष्ठेने आपल्या जबाबदारीचे काटेकोर पालन करतात. तथापि काही अधिकारी-कर्मचारी हे जबाबदारी टाळण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा आधार घेऊन प्रशासकीय नियोजनात अडथळे निर्माण करतात. निवडणुकी सारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण कामे टाळण्यासाठी जर कोणी खोट्या वैद्यकीय प्रमाणपत्राचा आधार घेतला आणि पडताळणीत ही बाब उघड झाली तर अशा व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करु असा इशारा जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

pune election duty marathi news, pune election training marathi news
पुणे : निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर; पाच हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती
Important decision of the supreme court
उमेदवारांनी संपत्ती म्हणून घड्याळही जाहीर करावं का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल; मालमत्ता प्रकरणी दिला महत्त्वपूर्ण निकाल
supreme court
उमेदवारांनी प्रत्येक जंगम मालमत्ता जाहीर करणे बंधनकारक नाही, सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
High Court Stays Caste Certificate Verification Committees Decision to Cancel Rashmi Barves Caste Validity Certificate
रश्मी बर्वे यांना दिलासा! जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती, मात्र…

आणखी वाचा- २०२३ सालातले ‘ते’ राजकीय संकटच पोटनिवडणुकीच्या पथ्यावर… वाचा नियम काय सांगतो…?

नागपूर व रामटेक लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येक गावपातळीवर मतदान प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या मनुष्यबळाचे नियोजन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सुमारे ३२ हजार शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना विविध टप्प्यात प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ५० हजारापेक्षा अधिक मनुष्यबळ निवडणूक प्रक्रियेत आहे. या निवडणुकीत ७५ टक्क्यापेंक्षा अधिक मतदान व्हावे यादृष्टीने जिल्हा निवडणूक विभागातर्फे तयारी केली असून याबाबत स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून गावपातळीवर जनजागृती केली जात असल्याची माहिती डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. निवडणूक प्रक्रियेचा दैनंदिन आढावा घेऊन त्यांनी ही माहिती दिली