अकोला : बालपणापासून मानवी जीवाला वेड लावणारा चंद्र रोज त्याच्या बदलत्या रुपांचे दर्शन देत असतो. १ ऑगस्टच्या मध्यरात्री व २ ऑगस्टला पहाटे आकाशात ‘सुपरमून’ अधिक मोठ्या प्रमाणात व चमकदार अशा स्थितीत असताना त्याचे हे आगळे-वेगळे स्वरूप दिसणार आहे, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी दिली.

चंद्र पृथ्वीपासून तीन लाख ५७ हजार कि.मी. अंतरावर असल्याने चंद्रबिंब आकाराने मोठे व अधिक प्रकाशित दिसेल. ऐरवी चंद्र पृथ्वीपासून सरासरी तीन लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. पृथ्वीच्या जवळ येणारा चंद्र सुपरमून म्हणून ओळखला जातो. आपला चंद्र पृथ्वीला सर्वात जवळ असल्याने आकाशात तो सर्वाधिक वेगाने अर्थात १२ अंश पूर्वेकडे सरकतो. प्रत्यक्षात मात्र चंद्र पश्चिमेस जाताना वाटतो. याचे कारण पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, असे प्रभाकर दोड म्हणाले.

हेही वाचा – महात्मा फुलेंसंदर्भात संभाजी भिडेंचा ‘यू टर्न’; अमरावतीमध्ये टीका अन् अकोल्यात अभिवादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – संभाजी भिडेंविरोधात विजय वडेट्टीवार यांची पोलिसांत तक्रार; चंद्रपुरातही काँग्रेस आक्रमक

सर्व जगात बहुमान प्राप्त करणाऱ्या भारताच्या चंद्रयानाने पृथ्वी कक्षा ओलांडून नुकताच चंद्र कक्षेत प्रवेश केला आहे. चंद्र आणि चंद्र कक्षेत दाखल झालेले चंद्रयान ३ असा अनोखा संगम आकाश प्रेमींना एक अनोखी आकाशभेट राहणार आहे. हा अनोखा आकाश नजारा अवश्य पहावा, असे आवाहन दोड यांनी केले आहे.