वर्धा : शिक्षक भरतीच्या प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष आहे. भरतीसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम लॉक करून घेण्यात आले आहे. त्यामुळे काम वेगाने करण्यास प्राधान्य दिले जात आहे. अनेक उमेदवारांना समान गुण मिळाले आहे. समान गुण असल्यास प्राधान्यक्रम ठरविण्याच्या काही तरतुदी आहेत. त्या विचारात घेऊन उमेदवारांचे योग्य क्रम ठरविण्याची कार्यवाही पूर्ण झाल्याचे शिक्षणाधिकारी कार्यालय सांगते.

त्यामुळे भरती प्रक्रिया आता महत्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. पात्र अभियोग्यताधारकांना संस्था तसेच जिल्हा परिषदेत नियुक्ती देण्यासंदर्भात याद्या तयार करण्याचे सांगणकीय काम सध्या सूरू आहे. ही प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असून कसलाच मानवी हस्ताक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात येत असल्याचा दावा शिक्षण खाते करते. मात्र, सर्व ती काळजी घेऊनही काही खोडसाळ व्यक्ती तसेच दलाल अभियोग्यता धारकांमध्ये संभ्रम निर्माण करून फसवणूक करण्याची शक्यता नाकारल्या जात नाही.

हेही वाचा – ‘या’ राज्यांत अवकाळी पावसाची शक्यता; विदर्भ, मराठवाड्याबाबत हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या…

संस्थेत किंवा जिल्हा परिषदेत नोकरी लावून देतो असे सांगून फसवणूक होण्याची शक्यता आहे. अश्या बाबींकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन आहे. संगणक प्रणालिमार्फत आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय कोणीही घेऊ शकतो. असे कृत्य करणारे दलाल किंवा अन्य कोणी प्रयत्न करीत असतील तर त्याचा फोन संवाद, फोटो किंवा अन्य पुरावे सांभाळून ठेवावे. पोलिसांकडे तक्रार करावी. तक्रार दाखल झाल्यावर प्रशासन पूर्ण सहकार्य करण्याची हमी देत आहे.

हेही वाचा – खासगी वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर डॉक्टरांच्या विद्यावेतन निकषाला छेद! निवासी डॉक्टर संतप्त…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, असा फसवणूक किंवा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्ती यांच्यावर पोलीस खात्यातर्फे स्वतंत्र निगराणी ठेवल्या जात आहे. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. भरती प्रक्रियेतील पारदर्शकपणावर विश्वास ठेवावा, अशी विनंती करण्यात आली आहे.