महाठग अजित पारसेच्या जामिनावर आज (मंगळवारी) अंतिम निर्णय होणार आहे. त्यानंतर पारसेच्या अटकेचा मार्ग पोलिसांना मोकळा होणार आहे. पारसेने अटकेपासून वाचण्यासाठी मोठी मोर्चेबांधणी केली असून प्रसिद्ध वकिलांची तो मदत घेत असल्याची माहिती आहे.

हेही वाचा- स्टेट बँकेत ‘एटीएम’शी संबंधित फसवणुकींची साडेसोळा हजार प्रकरणे

डॉ. राजेश मुरकुटे यांना होमिओपॅथी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातून कोट्यवधींचा निधी मिळवून देण्याच्या नावाखाली अजित पारसेने २ कोटी घेतले होते. तर सीबीआयची कारवाई थांबवण्यासाठी आणि नातेवाईकांनी दत्तक घेतलेल्या बाळाचे प्रकरणात गुन्हा दाखल न करता पोलिसांपासून संरक्षण मिळवून देण्यासाठी अडीच कोटींची खंडणी उकळली होती. त्यानंतर वझलवार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मनीष वझलवार यांनाही कोट्यवधींचा सामाजिक दायित्न निधी मिळवून देण्यासाठी १८ लाख रुपये उकळून फसवणूक केली. त्याने बनावट धनादेश वझलवार यांना दिले. या दोन्ही प्रकरणात कोतवाली आणि अंबाझरी पोलीस ठाण्यात अजित पारसेविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, त्याला एकाही गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली नाही. त्यामुळे गुन्हे शाखेच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केल्या जात आहे.

हेही वाचा- वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या बनावट यादीमुळे गोंधळ; बदल्या पुढे ढकलण्याची शक्यता

आजारपणाच्या नावाखाली पारसेला मिळाला पुरेसा वेळ

नियमित जीममध्ये कसरत करणाऱ्या पारसेने आजारी असल्याचे कारण देऊन थेट रुग्णालयातच मुक्काम ठोकला आहे. पारसे आजारी असल्याचे सांगत पोलिसांकडून त्याची अटक टाळत आहेत. त्यामुळे पारसेला जामीन मिळवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर आज, मंगळवारी अंतिम सुनावणी होणार आहे.

पारसेच्या मैत्रिणीची चौकशी करणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पारसेकडून पैसे घेणाऱ्या त्याच्या मैत्रिणीची पोलीस चौकशी करणार आहेत. तिला बँक स्टेटमेंट सादर करावे लागणार आहे. चौकशीमध्ये पारसेकडून वारंवार पैसे घेण्याचा ‘त्या’ मैत्रिणीचा उद्देशही समोर येणार आहे.