अकोला: शहरात खासगी शिकवणी वर्गाच्या परिसरात अवैधरित्या विनापरवाना कॅफे चालवण्यात येत आहेत. या माध्यमातून गैरप्रकारांना देखील चालना मिळते. त्यामुळे विनापरवाना कॅफेवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने घेतला.

बालकांसाठी कार्य करणाऱ्या विविध शासकीय संस्थांची बैठक प्राधिकरणाच्या कार्यालयात झाली. प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्यासह जिल्हा महिला व बालविकास कार्यालय व महापालिकेच्या परवाना विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा… अकोला: अद्ययावत माहिती न ठेवणे भोवले; नऊ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासगी शिकवणी वर्गाच्या परिसरात कॅफे अनधिकृतपणे चालवले जातात. या कॅफेमधून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बाबतीत काही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी अवैध कॅफेवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.