नागपूर : एक युवकाने चारित्र्यावरील संशयातून पत्नीचा हातोडीने ठेचून तर तीन वर्षीय मुलाला विष देऊन खून केला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री नऊ वाजता संगम रोड, वानाडोंगरी, गजानन कॉलनीतील ओयो हॉटेलमध्ये घडली. नाजनीन राऊत (२५), युग राऊत (३) आणि सचिन राऊत (३८, ईसासनी, भीमनगर, नागपूर) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन राऊत हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. त्याची पत्नी रुक्मिणी ही दोन मुलांसह ईसासनीत राहते. सचिन हा मध्यप्रदेशात एका नातेवाईकाच्या लग्नाला गेला असता त्याची ओळख नाजनीन नावाच्या तरुणीशी झाली. दोघांची मैत्री आणि नंतर विवाहबाह्य संबंध जुळले. सचिनने तिला लग्न करण्याचे आश्वासन देऊन मध्यप्रदेशातून पळवून आणले. तिला एकात्मतानगरात भाड्याने खोली करून ठेवले. त्यांना एक मुलगा झाला. याबाबतची माहिती पहिल्या पत्नीला मिळाली. तेव्हापासून सचिनचे पहिली पत्नी रुक्मिणी आणि नाजनीन यांच्यासोबत नेहमी वाद व्हायचे.

elderly couple Divorce marathi news, Divorce of elderly couple marathi news
काय हे….? मुलीचे लग्न तोंडावर असताना वृद्ध दाम्पत्याचा घटस्फोट…
Yavatmal, Abuse, married woman,
यवतमाळ : पतीच्या प्राध्यापक मित्राकडून विवाहितेवर अत्याचार, पेढ्यात गुंगीचे औषध देऊन…
Nagpur, girl Abuse, Lover absconded,
नागपूर : लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती होताच प्रियकर फरार
Crime News
गोळ्या झाडून आईची हत्या, हातोड्याचे वार करुन पत्नीला संपवलं, मुलांना छतावरुन फेकल्यानंतर तरुणाची आत्महत्या
Saneshkhali rape case
संदेशखाली प्रकरणात यु टर्न; टीएमसी नेत्यावरील बलात्काराची तक्रार मागे, भाजपावर आरोप करत पीडित महिला म्हणाल्या, “आम्हाला कोऱ्या कागदावर…’
Akola, Mother-in-law, murder,
अकोला : सासूची हत्या करून अपघाताचा रचला बनाव; चारित्र्यावर संशय घेतल्याने जावयाने….
sharad pawar on religion basis reservation
“धर्माच्या आधारावर आरक्षण आम्हाला मान्य नाही”; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मोदींनी स्वत:..”
man killed his one-day-old baby due to having doubts on wifes character
पत्नीच्या चारित्र्यावर संशय; वडिलांनीच केली एका दिवसाच्या बाळाची हत्या

हेही वाचा >>>लोकसभा ठरतेय प्रमुख उमेदवारांची अग्निपरीक्षा! आजी, भावी व माजी आमदारांसाठी विधानसभेची रंगीत तालीम!

युवकाशी मैत्री नडली

नाजनीन ही मुलगा युगसोबत वेगळी राहत होती. यादरम्यान तिची एका युवकाशी मैत्री झाली. त्यांच्या मैत्रीची कुणकुण सचिनला लागली. त्यामुळे त्याने चारित्र्यावर संशय घेऊन गेल्या आठ दिवसांपासून तिला मारहाण, शिवीगाळ करणे सुरू केले. नाजनीनसाठी स्वत:च्या संसारावर पाणी सोडल्यानंतर दगा देत असल्यामुळे तिला संपविण्याची योजना आखली. त्यासाठी त्याने कट रचला. 

शेवटची रात्र आणि…

सचिनने स्टँपपेपर आणला आणि त्यावर दोघांच्या सहमतीने एकमेकांशी असलेले पती-पत्नीचे संबंध तोडण्याचा करारनामा केला. त्यामुळे नाजनीनला शेवटची रात्र सोबत घालविण्याची विनंती केली. तिनेही होकार दिला. त्याने नाजनीन व युगला ‘गोल्डन की ओयो’ हॉटेलमध्ये नेले. रुम बुक केल्यानंतर सर्वप्रथम नाजनीनच्या डोक्यात हातोडीने वार करून तिचा खून केला. त्यानंतर युगला विष पाजले. दोघांचाही मृत्यू झाल्यानंतर सचिनने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

वेटर ऑर्डर घेण्यासाठी गेला अन् …

‘गोल्डन की ओयो’ हॉटेलमधील वेटर ऑर्डर घेण्यासाठी रुमजवळ गेला. त्याला खिडकीतून सचिन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याने मालकाला माहिती दिली. एमआयडीसी पोलीस आणि आयुक्तांसह उपायुक्त अनुराग जैन, सहायक आयुक्त गुरव घटनास्थळावर पोहचले. पोलिसांनी तीनही मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.