गडचिरोली : जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा उच्छाद सुरू असताना एका रानटी हत्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज, रविवारी सकाळच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील वाढोणा येथे उघडकीस आली. गावालगतच्या शेतात वीज प्रवाह सोडण्यात आला होता. त्यात कळपातील मादी हत्ती अडकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ३ वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील वाढोणा परिसरात रानटी हत्तींचा कळप दाखल झाला. जंगलालगत असलेल्या एका शेतात वीज प्रवाह सोडण्यात आला होता. दरम्यान, कळपातील एका मादी हत्तीला विजेचा जोरदार धक्का लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

wild elephant created havoc in the district gadchiroli three women seriously injured in attack
रानटी हत्तीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू ; दोघी गंभीर
Nanded, married couple suicide,
नांदेड : नवविवाहित दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या, कंधार तालुक्यातील कळकावाडीतील घटना
gondia Tragic Drowning Incident, Drowning Incident, Husband and Wife dead, tirora taluka, chorkhamara village, gondia news, Drowning news,
गोंदिया : तलावात बुडून पती-पत्नीचा मृत्यू
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी

हेही वाचा – यवतमाळ जिल्ह्यात खुनाच्या ७८ घटना, ८६ जणांचा मृत्यू, २१४ आरोपींना अटक!

हेही वाचा – अकोल्यात चक्क ‘पाकोळी’ पक्षांनी साकारली स्वतःची वसाहत, जाणून घ्या वैशिष्ट्ये…

कळपावर नजर ठेवणाऱ्या वनविभागाच्या ‘ड्रोन’ कॅमेऱ्यात दिसून आल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला असून विजेचा प्रवाह सोडणाऱ्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देसाईगंज वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली आहे. ३० डिसेंबररोजी आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथे एक वृद्ध महिलेचा बळी घेतल्यानंतर हा कळप कुरखेडा तालुक्यात दाखल झाला होता. उत्तर गडचिरोलीत रानटी हत्ती आणि वाघांनी धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.