नागपूर : सोमवारपेठेतील राज्य कामगार विमा रुग्णालयात मंगळवारी झालेल्या आंदोलनात काही कर्मचारी व पोलिसांना धक्काबुक्की झाली होती. आंदोलनात काही बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळल्यावर रुग्णालय प्रशासनाने या कंत्राटाचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथील या कंत्राटाशी संबंधित ७६ बाह्यस्त्रोत कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.

राज्य कामगार विमा रुग्णालय प्रशासनाने रुग्णांना चांगल्या सेवा देण्यासाठी वर्ग तीन व चारच्या ७६ बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांची सेवा ‘केएमआरएस’ कंपनीकडून घेतली आहे. या कंत्राटाचा ३१ जानेवारी २०२३ हा शेवटचा दिवस होता. मंगळवारी २५ ते ३० जणांच्या जमावाने स्वत:ला येथे सेवा देणारे कंत्राटी कर्मचारी सांगत त्यांचे वेतन थकल्याचा आरोप करत रुग्णालयात ‘राडा’ घातला. आंदोलन प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक केली. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सक्करदरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली.

retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Over 100 Private Hospitals in Pune Operate Without Renewed Licenses
धक्कादायक! पुण्यात शंभरहून अधिक रुग्णालये विनापरवाना
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

हेही वाचा >>> नागपूर : उत्सुकता शिगेला, मतमोजणी सुरू, गाणार, अडबाले की झाडे?

राज्य कामगार विमा रुग्णालयातील ‘केएमआरएस’ कंपनीचे बाह्यस्त्रोत कर्मचारी पुरवठ्याबाबतचे कंत्राट ३१ जानेवारीलाच संपले आहे. या कंपनीच्या मंगळवारच्या आंदोलनात काही तक्रारी पुढे आल्यामुळे या कंत्राटाचे नूतनीकरण करण्यात येणार नाही. वरिष्ठांना संबंधित घटनेचा सविस्तर अहवाल पाठवला असून पुढच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन मागितले आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई केली जाईल.

– डॉ. मीना देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा रुग्णालय, सोमवारीपेठ, नागपूर.