scorecardresearch

Premium

वर्धा : “देवेंद्र फडणवीस पाण्याचा गांभीर्याने विचार करणारा एकमेव नेता”; जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांचे गौरवोद्गार

पाण्याचा गांभीर्याने विचार करून त्यासाठी योजना राबविण्यात मनापासून प्रयत्न करणारा एकमेव नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस होय, अशा शब्दात जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले.

dr rajendrasingh devendra fadanvis
पाण्याचा गांभीर्याने विचार करून त्यासाठी योजना राबवणारा एकमेव नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस; जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांचे गौरवोद्गार

वर्धा : पाण्याचा गांभीर्याने विचार करून त्यासाठी योजना राबविण्यात मनापासून प्रयत्न करणारा एकमेव नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस होय, अशा शब्दात जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले.

हेही वाचा >>> नागपूर : अधिसंख्य कर्मचाऱ्यांची बाईक मिरवणूक गडकरींच्या निवासस्थानी; उपमुख्यमंत्र्यांशी भेट घालून देणार असल्याचे गडकरींचे आश्वासन

Chandrasekhar Bawankule in Ichalkaranji
समाज घटकांनी भाजपशी सामावून घ्यावे; चंद्रशेखर बावनकुळे यांचे इचलकरंजीत आवाहन
nitishkumar
रालोआत परतण्याची शक्यता नितीशकुमार यांनी फेटाळली
rajput
नागपूर: पोलीस निरीक्षक राजपूत यांच्याकडून तपास काढला; लैंगिक अत्याचार, छळ प्रकरण
radhakrishna vikhe patil chavadi
चावडी : वडय़ाचे तेल वांग्यावर.

हेही वाचा >>> गडचिरोली : १३ जणांचे बळी घेणारा सीटी १ वाघ पुन्हा देसाईगंजमध्ये; वनविभागाला हुलकावणी देत एकलपूरच्या जंगलात दाखल

७५ नद्यांच्या परिक्रमा उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत बोलताना डॉ. सिंह यांनी फडणवीसांच्या कामाची प्रशंसा केली. २०१४ मध्ये सत्तेवर येताच फडणवीस यांनी जलयुक्त शिवार ही देशातील पहिली कंत्राटदार मुक्त योजना राबविली, जलसाक्षरता वाढविली. त्यावेळी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट होते. पण फडणवीस सरकारने त्यावर मात केली. लोकसहभागातून यशस्वी ठरलेली ही पहिलीच योजना होय. देशात महाराष्ट्र हे पाण्याबाबत अत्यंत गंभीर असलेले राज्य आहे. नव्याने सत्तेवर येताच फडणवीस यांनी पाणीप्रश्नास प्राधान्य दिले. नदी परिक्रमा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल. त्यांना माझा सलाम. उपक्रमाचा आदेश मी वाचला, स्तुत्य आहे. संपूर्ण जल बिरादरी या कार्याशी जुळेल, अशी ग्वाहीही डॉ. सिंह यांनी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The only leader who takes water problem seriously rajendra singh said devendra fadnavis ysh

First published on: 02-10-2022 at 13:42 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×