भंडारा : दोन दिवसावर आलेल्या साखरपुड्यासाठी बॅग खरेदी करण्याकरिता भावासोबत दुचाकीवर गेलेल्या सीआरपीएफ जवान बहिणीचा अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलावर घडली. किरण सुखदेव आगाशे (२५) असे मृत तरुणीचे नाव आहे, तर लोकेश सुखदेव आगाशे (२१) रा. निलज खुर्द, ता. मोहाडी, असे जखमीचे नाव आहे. किरण मुंबई सीआरपीएफ कॅम्पमध्ये सेवेत होती. ती लोकेशसोबत तुमसर येथे बॅग खरेदीसाठी आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरेदी करून दुचाकीने ते निलजकडे जात होते. देव्हाडी उड्डाणपुलावरून जाताना समोरून आलेल्या दुचाकीने कट मारल्याने दोघेही भाऊ-बहिण रस्त्यावर पडले. दरम्यान, मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकखाली किरणचे डोके चिरडले गेले आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर भाऊ लोकेश गंभीर जखमी झाला. घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला होता. किरणचाचा विवाह ठरल्याने ती आठ दिवसांपूर्वी गावी आली होती. दोन दिवसांनंतर तिचे साक्षगंध होते. अपघाताची माहिती मिळताच आई व वडिलांनी हंबरडा फोडला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The sister was crushed by a truck in front of her brother in bhandara ksn 82 tmb 01
First published on: 17-12-2022 at 12:25 IST