नागपूर : काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोन्ही पक्षांची भूमिका सावरकर यांच्याबाबत भिन्न आहे. ‘सावरकर’ आमच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाहीत. लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पटोले म्हणाले, देशातील राजकीय परिस्थितीचा विचार करून एका मोठय़ा लढाईसाठी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आले. सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसची भूमिका आधीपासूनच स्पष्ट आहे, त्यात नवीन काहीच नाही. काँग्रेस पक्षाने विचारांशी कधीच तडजोड केली नाही. काँग्रेस सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करणारा पक्ष असून कुठल्याची जाती, धर्माचा वा व्यक्तीचा द्वेष करत नाही. सावरकरांच्या मुद्दय़ांवर आमचे नेते राहुल गांधी व शिवसेना नेते उद्धव ठाकरे चर्चा करतील, असेही पटोलेंनी स्पष्ट केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is no savarkar issue programme alliance thackeray group political situation nana patole ysh
First published on: 28-03-2023 at 00:02 IST