गोंदिया : जिल्हयात तीन वेगवेगळया घटनांमध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू झाला.   १ सप्टेंबर रोजी गोरेगाव तालुक्यातील कटंगी जलाशयात एका महिलेने उडी घेतली. कृणाली लोकेश हरिणखेडे वय २० वर्ष रा . मोहाडी ता.तुमसर जि . भंडारा असे  मृत महिलेचे नाव आहे.  दुसऱ्या घटनेत कोहमारा येथील तलावात एक तरुण बुडाला.  ही घटना बुधवार ३१ ऑगस्ट रोजी घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सतीश गोपाल कुरसुंगे वय ३८ वर्ष मृत तरुणाचे नाव आहे. तिसऱ्या घटनेत सालेकसा तालुक्यातील ग्राम गिरोला ते सालेकसा दरम्यान एका कालव्यात बुडून प्रल्हाद शिवाजी शहारे वय ४८ वर्ष रा . बोदलबोडी ता . सालेकसा या युवकाचा मृत्यू झाला  प्रल्हाद शहारे हे अपंग व मतिमंद होते. वीणा कचरू रहांगडाले रा. सोनारटोला – गिरोला यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three drown to death in three separate incidents in gondia district zws
First published on: 01-09-2022 at 17:28 IST