यवतमाळ: स्पिरीट व ब्लिचिंग पावडरचा वापर करून घरीच बनावट देशीदारू विक्रीचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पोलिसांनी उजेडात आणला. अवधूतवाडी पोलिसांना सोबत घेवून स्थानिक तारपुरा येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामुळे यवतमाळात बनावट दारू विक्रीचा प्रकार सुरू असल्याच शंका बळावली आहे.

विक्की राजेश जयस्वाल (३३, रा. तारपुरा), देवानंद सोनबाजी आडे (४५, डोर्ली डोळंबा), विशाल राजेश जयस्वाल (३३, रा. शिंदेनगर), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तिघेही डिनेचर स्पिरीट व ब्लिचिंग पावडरचा वापर करून बनावट देशी दारू बनवायचे. स्पिरीट व ब्लिचिंग पावडरचे मिश्रण करण्यात येत असल्याने त्याला जवळपास देशीदारूसारखा रंग यायचा. मद्य प्राशन केल्यावर नशेची झिंग चढत असल्याने नशा करणाऱ्यांना त्याची शंकाही येत नव्हती. घरीच बनावट दारू बनवून विक्री केली जात होती. राज्य उत्पादन शुल्क पथकाला तारपुरा येथे कमी किमतीत देशी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने पाळत ठेवून छापा टाकला. यावेळी घटनास्थळावरून ९० मिलीच्या ६० बॉटल व १८० मिलीच्या १८ बॉटल जप्त केल्या.

gangster fired on police during chasing
मुळशीतील मुठा गावात थरार ; गुंड नवनाथ वाडकरकडून पोलिसांवर गोळीबार
High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
Journalist Limesh Kumar Jangam arrested for demanding ransom of five lakhs
चंद्रपूर : पत्रकार लिमेशकुमार जंगमला पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक
Gadchiroli Police Arrests Two Female Naxalites One Supporter With Reward of 5 and half Lakhs
साडेपाच लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक; सी- ६० पथकाची कारवाई

हेही वाचा… सायलेन्सरवर चालला बुलडोझर, गोंदिया वाहतूक पोलिसांची कारवाई

आरोपी घरीच बनावट दारू बनविल्यावर भंगारमधून विकत आणलेल्या बॉटलमध्ये दारू भरायचे. शंका येऊ नये, यासाठी हुबेहुब झाकण लावायचे. मात्र, कमी किमतीत दारू विक्री करण्यात येत असल्याने हा प्रकार चव्हाट्यावर आला. स्पिरीट नेमके कुठून विकत आणले, हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसोर आहे. या दारूचे नमूने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेसह लेबल असलेल्या दारू निर्मिती करणाऱ्या कंपनीकडे पाठविण्यात येणार आहे. बनावट दारूसंदर्भात नागरिकांना काही माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नीतेश शेंडे यांनी केले आहे.