नागपूर : महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पात सोडलेल्या वाघिणीने आता नैसर्गिकरित्या स्थलांतर करत झारखंड राज्यात प्रवेश केला आहे. कृत्रिमरित्या स्थलांतरित केलेल्या वाघिणीने नंतर नैसर्गिकरित्या इतर राज्यात स्थलांतर करण्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून २७ ऑक्टोबरला ‘यमुना’ तर १५ नोव्हेंबरला ‘झिनत’ या वाघिणीचे ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पात स्थलांतर करण्यात आले. या दोन्ही वाघिणींना जंगलात सोडण्यापूर्वी व्याघ्रप्रकल्पाच्या खुल्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. त्यावेळी दोघींनीही सहज शिकार केली. त्यानंतर त्यांना व्याघ्रप्रकल्पात सोडण्यात आले.

हेही वाचा : Santosh Deshmukh Case : बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; दोन आरोपींना अटक, एका पीएसआयचं निलंबन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तीन वर्षांची ‘झीनत’ ही वाघीण आता नैसर्गिकरित्या स्थलांतर करत झारखंडमध्ये दाखल झाली आहे. महाराष्ट्रातून आणलेल्या वाघिणीला २४ नोव्हेंबरला सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पात सोडण्यात आले. या वाघिणीचे आरोग्य उत्तम असून तिने झारखंडमधील जंगलात प्रवेश केला आहे. झारखंडचे जंगल उत्तरेकडील सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पाशी जोडले आहे. झीनत आता सिमिलीपाल क्षेत्र सोडल्यानंतर झारखंडमध्ये फिरत आहे. तिने रविवारी झारखंडमधील जंगलात प्रवेश केला. तिच्या हालचालींवर चमूद्वारे लक्ष ठेवले जात आहे. झारखंडच्या वनाधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली आहे. या वाघिणीच्या गळ्यात ‘रेडिओ कॉलर’ आहे. तर ‘यमुना’ वाघीणही सिमिलीपाल जंगलात आहे.