scorecardresearch

बुलढाणा : टिप्परची एसटी बसला धडक, अपघातात २२ प्रवासी जखमी

जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले असून, जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. आज शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला.

Tipper hit ST bus in Buldhana
टिप्परची एसटी बसला धडक, अपघातात २२ प्रवासी जखमी (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

बुलढाणा : मेहकर-खामगाव मार्गावरील जानेफळ नजीकच्या समृद्धी महामार्गाच्या अंडरपास नजीक एसटी बस व रेतीवाहक टिप्परमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात सुमारे २२ प्रवासी जखमी झाले. जखमींना मेहकर येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले असून, जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. आज शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला.

हेही वाचा – बुलढाणा: भांडण सोडविणे बेतले जीवावर, बेदम मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू

हेही वाचा – स्रोत प्रदूषित झाल्याने शुद्ध जल मिळणे कठीण, काय म्हणतात जलतज्ज्ञ?

शेगाववरून मेहकरकडे ही मेहकर आगाराची बस येत असताना टिप्परने धडक दिल्याचे प्राथमिक वृत्त आहे. यात २२ प्रवासी जखमी झाले असून बहुतेक प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील आहे. जखमींची नावे आशू बोरकर, सीताराम दळवी, मदन गाडे, सतीश गायकवाड, विनोद गायकवाड, विमल गायकवाड, रामेश्वर भोपळे, पूर्णाजी बोरकर, रामेश्वर हिवरकर ( हिवरा खुर्द ता. मेहकर), माधव नलगे ( ईसोली ता. चिखली) रत्नकला काळे (डोनगाव ता. मेहकर), किरण जाधव, श्रावणी जाधव, पांडुरंग भोलनकर (पिंपरखेड, ता. चिखली) रुखिमिनी अवसरमोल (घाटनांदरा ता. मेहकर) मनोज राठोड (विठ्ठलवाडी ता मेहकर) सिद्धार्थ वानखेडे (कल्याना ता. मेहकर) प्रवीण बोरकर (पलसखेड ता. चिखली) परशुराम देवकर (ब्रम्हपुरी ता. मेहकर) वाल्मिक मुरडकर, यश उलटे (अमडापूर चिखली) वासुदेव फोलके (जानेफळ ता. मेहकर) सविता राजू मोंधाला (ता. मेहकर) अशी जखमींची नावे आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 14:42 IST

संबंधित बातम्या