गोंदिया : सध्या सर्वत्र भाजी बाजारातील दरपत्रक बघितल्यास भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहे. त्यात टोमॅटो सर्वाधिक भाव खाऊन जात आहे.

गोंदिया भाजी बाजारात गुरुवारी टोमॅटो १२० रुपये ते १५० रुपये विक्री केला गेला. अश्याच एका दुकानात चिल्लर विक्री करिता खरेदी करून ठेवलेला २० कॅरेट टोमॅटो आणि इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी भाजी बाजारातील दुकानातून चोरून नेल्याची घटना घडली.

हेही वाचा… वर्धा: मध्यभारतातील पहिली कौशल्य प्रयोगशाळा स्थापन, काय आहे विशेष जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज सर्वत्र भाजी बाजारात या घटनेची चर्चा इतर भाजी विक्रेते करीत होते. या संदर्भात फिर्यादी बबन उर्फ (बब्बु) गंगभोज यांनी त्यांचे भाजी बाजारातील दुकानातून मध्यरात्री २० करेट टोमॅटो किंमत ३० हजार व इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा १० हजार असे एकूण ४० हजार रुपये या टोमॅटो चोरी ची घटना गोंदिया शहर पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.

हेही वाचा… चोवीस तासांत दोन हत्याकांडाने उपराजधानी हादरली

परिसरातील इतर दुकानात लागलेल्या सीसीटीव्ही ची चित्रफित तपासून या टोमॅटो चोराचा तपास गोंदिया शहर पोलिस करीत आहे.