नागपूर : नक्षलग्रस्त गडचिरोलीत एकीकडे प्राणांतिक अपघात ६७ टक्क्यांनी वाढले असतानाच येथे ‘आरटीओ’च्या वायूवेग पथकाला रस्त्यांवर गस्त घालण्यावरही मर्यादा आहेत. त्यामुळे परिवहन खात्याने येथे एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीद्वारे (आयटीएमएस) वाहतूक नियंत्रणाचा निर्णय घेत तसा प्रस्ताव शासनाला दिला आहे.

नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या सहा जिल्ह्यांत जानेवारी २०२२ ते मार्च २०२२ दरम्यान ४६१ प्राणांतिक अपघात होऊन ५१८ जणांचा मृत्यू झाला. ही संख्या जानेवारी २०२३ ते मार्च २०२३ दरम्यान २० टक्क्यांनी कमी झाली. २०२३ मध्ये येथे ३७१ प्राणांतिक अपघात होऊन ३९९ जणांचे मृत्यू झाले. येथील पाच जिल्ह्यांत अपघात कमी झाले, परंतु गडचिरोलीत ६७ टक्क्यांनी वाढले.

हेही वाचा – राजू केंद्रे यांची लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्समध्ये निवड

सूरजागडमधील लोह प्रकल्पामुळे येथे खनिजाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातच दुसरीकडे येथे रस्ते व पुलांचेही काम सुरू आहे. त्यामुळे येथील अपघात वाढल्याचे आरटीओचे निरीक्षण आहे. दुसरीकडे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वायूवेग पथकाला नक्षल समस्येमुळे विविध भागांत गस्त घालण्यावर मर्यादा आहे. त्यामुळे येथील अपघात कमी करण्याचे मोठे आव्हान परिवहन खात्यासमोर आहे. या समस्येवर परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी ‘आयटीएमएस’चा पर्याय शोधला आहे. त्यांच्या सूचनेवरून ‘आरटीओ’कडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला या प्रणालीबाबतचा प्रस्ताव सादर झाला आहे. या प्रणालीसाठी सुमारे २० ते २५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

हेही वाचा – विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा; अमरावती, वाशीममध्ये गारपीट

“नक्षल समस्येमुळे गडचिरोलीतील तीन चौक आणि एका महामार्गावर ‘आयटीएमएस’द्वारे वाहतूक नियंत्रणाचा प्रस्ताव आहे. या प्रणालीनुसार जास्त वाहतूक असलेल्या भागातील सूचना तातडीने नियंत्रण कक्षाला मिळेल. त्यानंतर तेथे वायूवेग पथकाला पाठवून समस्या सोडवली जाईल. सोबत कुठे अपघात वा वाहतुकीचे नियम मोडल्यास तेथेही तातडीने चमू पाठवता येईल.”, असे मुंबई, परिवहन आयुक्त, विवेक भिमनवार म्हणाले.

पूर्व विदर्भातील प्राणांतिक अपघाताची स्थिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(कालावधी- जानेवारी ते मार्च दरम्यान)

जिल्हा/शहर२०२२२०२३
नागपूर (श)७५ ५२
नागपूर (ग्रा.)१३२ ९७
वर्धा ६१ ४७
भंडारा४३ २६
गोंदिया३०२७
गडचिरोली२४ ४०
चंद्रपूर ९६ ८२
एकूण ४६१३७१