बुलढाणा: भरधाव क्रुझर’ वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दोन युवक ठार झाले. बुलढाणा नजीकच्या राजूर घाटात आज दुपारी ही दुर्घटना घडली. मृत नांदुरा तालुक्यातील राहिवासी आहेत.

बुलढाणा – मलकापूर राज्य मार्गावरील राजूर घाटातील पहिल्या वळणावर हा अपघात झाला. दोन युवक (एमएच १४ए ए ८१६१ क्रमांकाच्या) दुचाकीने बुलढाण्याकडे येत होते. दरम्यान भरधाव येणाऱ्या (एमएच १४ एच डी ०८६७) क्रुझरने दुचाकीला धडक दिली. यामुळे दुचाकीस्वारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

हेही वाचा… केक कापून चक्क खड्ड्यांचा वाढदिवस; स्वराज्य संघटनेकडून निषेध आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राथमिक तपासात महेश मारोती मुर्हेकर ( २८) व आत्माराम दुर्योधन भोलनकर( ३७) अशी मृतांची नावे असल्याचे निष्पन्न झाले. दोघे नांदुरा तालुक्यातील शिरसोली येथील रहिवासी आहेत. हे वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.