चंद्रपूर : जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून वाघाने तीन दिवसात तीन जणांचा बळी घेतला आहे. आज मूल तालुक्यातील चिंचाळा येथे वाघाच्या हल्ल्यात दोन गुराखी जागीच ठार झाल्याची घटना १९ सप्टेंबर बुधवार दुपारच्या सुमारास घडली. नानाजी निकेसर ५३, ढिवरू वासेकर ५५ असे मृत गुराख्याचे नाव आहे. मागील तीन दिवसात तीन गुराख्यांचा मृत्यू झाला असून एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.

हेही वाचा >>> भंडारा: वीज बिलाच्या नावाखाली न्यायाधीशांची ३ लाखांची ‘ऑनलाईन’ फसवणूक

हेही वाचा >>> वाशीम: परिवहन विभागाकडून ५९ खासगी बसेसवर कारवाई, केवळ १० टक्के अधिक भाडे आकारण्यास मुभा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिंचाळा येथील गुराखी नानाजी व ढिवरू हे गुरे चारण्यासाठी चिंचाळा परिसरातील जंगलात गेले होते. जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक नानाजी यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी नानाजीने आरडा-ओरड केल्याने ढिवरू वासेकर हा मदतीसाठी गेला. वाघाने त्यांच्यावरही हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. घटनेची माहिती मिळताच गावकरी व वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. पंचनामा केल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.