अमरावती शहरातील प्रभात चौक या अतिशय वर्दळीच्या ठिकाणी दुपारच्या सुमारास दोन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेच पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेबाबत दुखं व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतकांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे.

हेही वाचा – …तर राजीनामा देऊन मैदानात उतरणार ; आमदार बच्चू कडू यांचा इशारा

Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

अमरावती शहरातील प्रभात टॉकिज जवळील जीर्ण झालेली दुमजली इमारत रविवारी दुपारी कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. महापालिककेने सुमारे चार वर्षांपूर्वी ही इमारत जीर्ण झाल्याने संबंधितांना ती पाडण्याची नोटीस बजावली होती. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून ही इमारत पाडण्याचे काम सुरू होते. रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास इमारतीचा पहिला माळा अचानक कोसळला.

हेही वाचा –वाद चिघळला! रवी राणांवरील टीका पडली महागात, बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल

राजेंद्र लॉज या नावाने ओळखली जाणारी ही इमारत बरीच जुनी होती. ती जीर्ण झाल्याचा फलकही महापालिकेने या ठिकाणी लावला होता. या व्यावसायिक इमारतीच्या पहिल्या माळ्याचे बांधकाम पाडण्याचे काम सुरू होते, त्याचवेळी ही इमारत कोसळली. तळमजल्यावर बॅग विक्रीचे दुकान होते. आमदार सुलभा खोडके यांनी घटनास्थळी पोहचून बचाव कार्याची पाहणी केली.

फडणवीसांकडून मदत जाहीर

या घटनेतील मृतकांच्या कुटुंबियांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत जाहीर केली आहे. ”अमरावती येथे एक जुनी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जखमी आहेत. जिल्हाधिकार्‍यांशी मी संपर्कात आहे. या घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत.

या घटनेत जीव गमवावे लागलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सारे सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल”, असे ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.