२०२२ मध्ये प्रवासी संख्येचे नवीन उच्चांक गाठल्यावर, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर मेट्रोने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. १ जानेवारी २०२३ – रविवारी रात्रीपर्यंत मेट्रोतून २०२६०८ नागपूर जनतेने प्रवास केला होता. प्रवासी संख्येचा अंदाज घेत महामेट्रोने मेट्रो फेऱ्यात वाढ केली आणि रात्री १०.३० पर्यंत सर्वच टर्मिनल स्टेशनवर मेट्रो सेवा दिली.

हेही वाचा- सावधान! समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय, तर मग आधी ‘हे’ वाचाच…

mumbai csmt marathi news, mumbai csmt slide stairs marathi news
मुंबई: हिमालय पुलाजवळील सरकता जिना आठवड्यातच बंद
Change in train schedule due to night block at Vikhroli
विक्रोळीतील रात्रकालीन ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
Panvel Municipal Corporation
एका दिवसांत तीन कोटींहून अधिक कर जमा, पनवेल महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत ३३३ कोटी रुपये
Loksatta viva A glamorous celebration of fashion Lakme Fashion Week Geo World Garden
लॅक्मे फॅशन वीकची सेलिब्रिटी मांदियाळी

११ डिसेंबर रोजी महामेट्रोच्या दोन लाईनचे उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यानंतर, म्हणजे १८ डिसेंबर रोजी, महामेट्रोने आणखी एक महत्वाचा टप्पा गाठत दीड लाखाची प्रवासी संख्या मिळवली होती. त्या नंतर २५ डिसेंबर रोजी १,६८,६३० इथवर मजल मारली होती. प्रवाशांना नागपूर मेट्रोचे महत्व पटावे आणि प्रवासा दरम्यान त्यांचे मनोरंजन होण्याकरता मेट्रोतर्फे २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान रायडरशिप अभियान आणि कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत जादूचे प्रयोग, गाण्याचे कार्यक्रम, अनोख्या वस्तूंचे प्रदर्शन, मेट्रो संवाद असे अनेक उपक्रम राबवले