आम्ही मोदींना राममंदिरासाठी कायदा करा, असं म्हणत होतो. पण तेव्हा मोदी त्यावर बोलायला तयार नव्हते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर टीकोजी राव फणा काढून अयोध्येला जाऊन बसले, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. नागपूरमध्ये वज्रमूठ सभेत बोलताना त्यांनी अयोध्या दौऱ्यावरून शिंदे-फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

हेही वाचा – “सच्च्या समाजसेवकासमोर तुम्हाला झुकावंच लागलं”, उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर हल्लाबोल; म्हणाले, “सत्तेची नशा…”

Santosh Parab attack case,
संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणे यांना मंजूर जामीन रद्द करा, राज्य सरकारच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची राणे यांना नोटीस
Dudhganga tap water scheme,
इचलकरंजीची दूधगंगा नळपाणी योजना रखडल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर राजू शेट्टी यांचे टीकास्त्र
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“राज्यात अवकाळी पाऊस असताना शिंदे सरकार अयोध्येला गेले, मी मुख्यमंत्री असताना आम्हीही अयोध्येला गेले होतो. संजय राऊत आणि सुनील केदारही त्यावेळी माझ्याबरोबर होते. पण ती वेळ वेगळी होती. मी अयोध्येला पहिल्यांदा गेलो, तेव्हा राम मंदिराचा मुद्दा ठंड बस्त्यात होता. याची सुरुवात शिवसेनेने केली. आम्ही मोदींना राम मंदिरासाठी कायदा करा, असं म्हणत होतो. पण मोदी त्यावर बोलायला तयार नव्हते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर टिकोजी राव आता फणा काढून अयोध्येत जाऊन बसले”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

हेही वाचा – “शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राला सुडाचं राजकारण दिलंय, त्यांनी…”; ‘वज्रमूठ’ सभेतून जयंत पाटलांचा हल्लाबोल!

“…म्हणून फडणवीसांना अयोध्येची आठवण झाली”

पुढे बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्र सोडलं. “मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसही कधी अयोध्येला गेले नव्हते. आता शिंदे अयोध्येला गेले, तेव्हा फडणवीसांना अयोध्येची आठवण झाली. राज्यात इकडे अवकाळी शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांच्य डोळ्यात अश्रू आहेत आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अयोध्येत जाऊन बसले”, असे ते म्हणाले.