नागपूर : ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात २९ टक्के वेगाने तापमानवाढ होत आहे आणि मोठी शहरे अधिक वेगाने गरम होत आहेत. जगभरातील शहरे सरासरी दर दशकात ०.५ अंश सेल्सिअसने तापमानवाढ करत आहेत. तसेच हवामान बदल आणि शहरी विस्तारामुळे पृष्ठभागाच्या तापमानात वाढ होत असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृक्षारोपणाने शहरी हरितीकरणात थोडीफार भर पडते. युरोपीय शहरांमधील हिरवळीमुळे दर दशकात सुमारे ०.१३ अंश सेल्सिअस पृष्ठभागाच्या तापमानाची भरपाई केली जाते, असे चीनमधील नानजिंग विद्यापीठातील संशोधक आणि सहकाऱ्यांनी या अभ्यासात म्हटले आहे. शहरांमध्ये राहणारे लोक शहरी उष्णतेच्या बेटाच्या प्रभावामुळे, सामान्य लोकसंख्येपेक्षा उष्णतेच्या लाटेच्या घटनांमध्ये जास्त उष्णतेचा अनुभव घेतात. यात शहरी जमीन आसपासच्या ग्रामीण जमिनीपेक्षा जास्त गरम होते, असे ते म्हणाले.

हवामानातील बदल आणि शहरांमधील लोकसंख्या वाढीमुळे पृष्ठभागावरील शहरी उष्णतेच्या बेटावरील प्रभावात वाढ होण्याचा अंदाज आहे. मात्र, भविष्यातील मानवी उष्णतेच्या अनेक वर्तमान अंदाजानुसार, शहरी आणि ग्रामीण भागातील पृष्ठभागाच्या तापमानात समान वाढ होईल, असे संशोधकांनी सांगितले. दशकात शहरांमध्ये ०.२३ अंश सेल्सिअस तापमानवाढीसाठी शहराचा होणारा विस्तार जबाबदार आहे, असे संशोधकांचे मत आहे. 

अभ्यास कसला?

‘कम्युनिकेशन्स अर्थ अँड एन्व्हायर्नमेंट’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झालेल्या या अभ्यासात २००२ ते २०२१ दरम्यान जगभरातील दोन हजार शहरांच्या जमिनीच्या पृष्ठभागाच्या तापमानाचे विश्लेषण करण्यात आले. त्यांची तुलना ग्रामीण भागातील जमिनीच्या पृष्ठभागाच्या तापमानाशी करण्यात आली.

हवामान बदलामुळे..

’हवामान बदलाचे शहरी पृष्ठभागाच्या तापमानवाढीमध्ये सर्वात मोठे योगदान आहे, ज्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान प्रत्येक दशकात सरासरी ०.३० अंश सेल्सिअस वाढते, असा संशोधकांचा अंदाज आहे.

  • युरोपातील शहरांमध्ये असणाऱ्या हिरवळीमुळे प्रत्येक दशकात पृष्ठभागाच्या तापमानवाढीच्या ०.१३ अंश सेल्सिअसची भरपाई होते.
  • शहरातील ही हिरवळ पृष्ठभागाच्या तापमानात होणाऱ्या वाढीची गती कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urban warming 29 percent faster than rural areas worldwide study researchers china ysh
First published on: 08-10-2022 at 00:02 IST