नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. या हत्तींना ओटोक्यात आणता येईल पण राजकारातील हत्तींचा आधी बंदोबस्त करायचा आहे, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा – हिंदी विद्यापीठ : जाहीर सत्याग्रह करण्याचे घोषित करीत विद्यार्थी आक्रमक

हेही वाचा – नागपुरातील प्राणवायू निर्मिती प्रकल्पाची ‘भ्रूणहत्या’! विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे म्हणणे काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतदारसंघातील हत्तीच्या धुमाकुळासंदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आपण रानटी हत्तींविषयी चर्चा करत राहू, त्यांना ओटोक्यातदेखील आणू. पण अलिकडे राजकारणातील हत्तींनी खूप धुमाकूळ घातला आहे. राजकारणातील हत्ती, मुजोर हत्ती कुठेही शिरत आहे, नासधूस करीत आहे. ते स्व:भक्षण करण्यापेक्षा दुसऱ्याचे नुकसान अधिक करीत आहेत. त्यांचा बंदोबस्त आधी करावा लागणार आहे. वडेट्टीवार यांच्या बोलण्याचा रोख भाजपकडे होता.