नागपूर : भारतीय हवामान खात्याने नुकताच मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. देशात नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य राहणार असून ९४ ते १०४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, तो उशिराने दाखल होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतातील शेती ही पावसावर अवलंबून आहे आणि या अंदाजाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यंदाच्या मान्सूनवर अल निनोचादेखील प्रभाव राहील अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली होती. एल निनो म्हणजे कमी पाऊस असे असले तरीही एल निनो असताना अनेकदा चांगला पाऊसही झाला आहे. मान्सून सध्या बंगालच्या उपसागराकडे सरकत असून केरळमध्ये तो चार जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. देशातील काही भागांत सामान्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर काही भागांत सामान्यापेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the imd forecast for monsoon rgc 76 ssb
First published on: 27-05-2023 at 15:30 IST