लोकसत्ता टीम

नागपूर : काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, पक्ष नेत्यांना सांभाळू शकत नसल्याने ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहे. राहुल गांधी पक्षातील नेत्यांना वेळ देत नाही. त्यामुळे काँग्रेस आता देश आणि राज्यस्तरावर कमकुवत झाला आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केली.

बावनकुळे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेस नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असून गेल्या काही दिवसात अनेक नेते पक्षातून बाहेर पडले आहे. अशोक चव्हाण, संजय निरुपम, अर्चना पाटील चाकुरकर, बसवराज पाटील ,उल्हास पाटील या नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. काँग्रेसमधून असलेले अनेक नेते सांगतात. राहुल गांधी यांना वेळ नाही , ते भेटत नाही. आम्हाला कोणी विचारत नाही. मुळात राहुल गांधी यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष अजुन कमकुवत झालेला दिसेल. शिवाय जशी जशी मोदी यांची त्सुनामी महाराष्ट्रात येईल तसे आणखी मोठे पक्षप्रवेश झालेले दिसतील.

आणखी वाचा-नागपूर लोकसभा मतदारसंघातील ‘या’ उमेदवाराला झटका; उच्च न्यायालय म्हणाले, ‘निवडणुकीत हस्तक्षेप…’

संजय निरुपमशी चर्चा झाली नाही

मोदीच्या विकसित भारताला साथ देणारा आणि भाजप विचारावर काम करण्याची तयारी असेल अशा सर्वासाठी आमचा दुपट्टा तयार आहे. संजय निरुपम यांनी भाजपमध्ये येण्यासंबंधी कुठलाही निर्णय घेतला नाही आणि आमची काही त्यांच्यासोबत चर्चा नाही असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

उमेदवार बदलाशी संबंध नाही

हिंगोलीचा शिवसेनेचा उमेदवार बदलला. त्याचे अधिकार एकनाथ शिंदेना आहे. अजित पवारांना यांचे उमेदवार ठरविण्याचा अधिकार आहे. याच्याशी भाजपचा संबध नाही भाजपाच्या वाट्याला ज्या जागा आल्या त्याचे आम्ही सर्वेक्षण केले. शिवसेनेच्या जागेचे सर्वेक्षण करण्याचा आमचा काहीच संबंध नाही असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.