काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर चर्चेत आलेला ‘गावगुंड’ मोदी अखेर शुक्रवारी नागपुरात अवतरला. पटोले यांनी ज्या मोदीबाबत वक्तव्य केले होते तो आपणच असून आपलेच टोपण नाव मोदी असल्याचा दावा उमेश प्रेमदास घरडे याने पत्रकार परिषदेत केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी हे नाच उच्चारून केलेल्या वक्त्व्यावरून राजकारणात मोठे वादळ उठले होते. मात्र  हे वक्तव्य पंतप्रधान मोदींबाबत नसून  मोदी हे टोपण नाव असलेल्या गावगुंडाबद्दल होते, असा दावा पटोले यांनी केला होता. त्यानंतर वकील सतीश उके या गावगुंड मोदी म्हणजेच उमेश घरडेसोबत आले होते.

यावेळी टीव्ही ९ मराठीशी बोलताना उमेश घरडे म्हणाला, “दारूच्या नशेत मी कोणाला काहीही बोलून देतो, दारू प्यायल्यानंतर नाना पटोले यांच्यासह आणखी एकाला मी शिवीगाळ गेली होती. मला नाना पटोले यांची माफी मागायला जाणार होतो, परंतु मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, पोलीस स्टेशनला तक्रार दिली मग गावी गेलो, लोक तिथे धमकी द्यायचे, त्यानंतर मी परत नागपूरला आलो. त्यानंतर वकील सतीश उके यांना भेटलो,” असं त्यांनी सांगितलं.

“बायको सोडून गेल्यामुळे त्याला मोदी म्हणतात. गेल्या ४ वर्षांपासून त्याला लोक मोदी म्हणतात. गावातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे त्याला मोदी नावानेच हाक मारतात. त्याला त्याच्या नावाने कोणीच हाक मारत नाही,” असं वकील सतीश उके म्हणाले.

‘मोदी हे माझे टोपण नाव’ ; ‘गावगुंड’ अखेर माध्यमांसमोर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर, “मी दारूचा व्यवसाय करतो, नाना पटोले मला बोलत असतील, तर मी त्यांना देखील बोलू शकतो, माझी बायको सोडून गेल्यानंतर मला सगळे मोदी बोलू लागले. मी गावात भांडणं, हाणामारी करत असतो, त्यामुळे लोक मला घाबरतात,” असं उमेश घरडे म्हणाला.