पतीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करूनही पत्नी गर्भवती ; पतीची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार |Wife remains pregnant despite husband family planning surgery Husband complaint to District Health Officer gondiya | Loksatta

पतीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करूनही पत्नी गर्भवती ; पतीची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार

शासनाच्या धोरणानुसार मर्यादित अपत्य संख्या ठेवण्याची जबाबदारी स्वीकारून विवेकने प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव येथे स्वतः कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली.

पतीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करूनही पत्नी गर्भवती ; पतीची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार
प्रातिनिधिक छायाचित्र / लोकसत्ता

गोंदिया : दोन अपत्ये झालीत, तिसरा होऊ नये म्हणून शासनाच्या नियमाचे पालन करीत आणि आपली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पतीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली. मात्र, पत्नी आठ महिन्याची गर्भवती असल्याचे समोर येताच त्याला धक्का बसला. हा प्रकार येथील सातगाव आरोग्य केंद्रांतर्गत साखरीटोला येथे उघडकीस आला.

विवेक गोपीचंद खांदारे यांना दोन अपत्य आहेत. शासनाच्या धोरणानुसार मर्यादित अपत्य संख्या ठेवण्याची जबाबदारी स्वीकारून विवेकने ५ ऑक्टोबर २०२१ ला प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव येथे स्वतः कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली. डॉ. अभय पाटील यांनी ही शस्त्रक्रिया केली. मात्र यानंतरही त्यांची पत्नी आठ महिन्याची गर्भवती राहिली. ही बाब पती-पत्नीला चार महिने झाल्यानंतर कळली तेव्हा ते आरोग्य केंद्रात गेले. तालुका वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित खोडणकर यांनी त्यांना के.टी.एस. जिल्हा सामान्य रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अनेकदा प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क केला मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. डॉक्टरांनी वेळीच योग्य सल्ला न दिल्यामुळे विवेक खांदारे यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलीस स्टेशन सालेकसा यांच्याकडे तक्रार करीत कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा : हेही वाचा : गडचिरोली : पोलीस नक्षल चकमक, परिसरात शोधमोहीम सुरू

विवेक खांदारे मोलमजुरीची कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. स्वतःच्या कमाईत तीन अपत्याचे पालनपोषण करणे शक्य नसल्याने व शासन नियमानुसार दोनच अपत्य असावे, यासाठी त्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली. मात्र, डॉक्टरांच्या चुकीमुळे पत्नी तिसऱ्यांदा गर्भवती राहिली आहे. तिसरे अपत्य जन्माला आल्यास त्याचे पालनपोषण कसे करायचे, त्याची जबाबदारी कोण घेईल, असे प्रश्न पती-पत्नीसमोर उभे ठाकले आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“माझ्यासारखा भिकारी तर काहीच करू शकत नाही, हे…”, पंतप्रधान मोदींचं नाव घेत राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य

संबंधित बातम्या

वंचितच्या सत्तेसाठी भाजपात फूट ; अकोला जि.प. सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपची ‘मविआ’ला तीन, तर वंचितला दोन मते
चंद्रपूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीत कलह ; ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचा राजीनामा
नागपूर : शहराच्या गौरव गीताचा महापालिका प्रशासनाला विसर
‘चित्रा नव्हे, त्या तर ‘विचित्र ताई’! यशोमती ठाकूर यांची शेलकी टीका
प्रेयसीच्या बहिणीवर ९ महिन्यांपासून अत्याचार; अश्लील छायाचित्र व चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
FIFA World Cup 2022 : कोरिया बाद फेरीत, उरुग्वेचे आव्हान संपुष्टात
FIFA World Cup 2022: अर्जेटिनाच्या मार्गात ऑस्ट्रेलियाचा अडथळा
मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; राष्ट्रपतींच्या मंजुरीमुळे दिलासा
न्यायवृंद व्यवस्था पारदर्शकच; ती कोलमडून पडू नये; सर्वोच्च न्यायालयाचे मत
मंत्र्यांना बेळगावात पाठवू नका! ; कर्नाटकचे महाराष्ट्राला पत्र; चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई दौऱ्यावर ठाम