बुलढाणा: बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या मागील तब्बल ६७ वर्षांचा इतिहास लक्षात घेतला तर मतदारांनी प्रमुख राजकीय पक्षांच्याच उमेदवारानाच आपला कौल दिल्याचे स्पष्ट होते . रिंगणात असलेल्या अपक्ष उमेवारांना बुलढाण्यातील मतदारांनी नेहमीच दुर्लक्षित केले आहे. यामुळे यंदा अपक्ष उमेदवार निवडून येणार काय ? याची खमंग चर्चा मतदारसंघात होत आहे.

सन १९५२ ते २०१९ दरम्यान झालेल्या बुलढाणा लोकसभा लढतीत एकाही अपक्ष उमेदवाराला विजय मिळविता आला नाहीये! रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवारांना जिल्हावासीयांनी आजवर गांभीर्याने घेतले नाही. काही लढतीत १० पेक्षा जास्त तर १९९१ च्या लढतीत तब्बल वीसेक अपक्ष असूनही आजवर मतदारांनी त्यांना पाठबळ देण्याचे टाळले. मात्र आजवरच्या दीर्घ काळात कोणताही प्रबळ नेता अपक्ष म्हणून मैदानात उतरला नाही, असाही इतिहास आहे.

हेही वाचा…‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली

यंदाच्या निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी हवा केली आहे. त्यामुळे यंदाची लढत तिरंगी ठरली आहे. मात्र ही हवा शेवटपर्यंत कायम राहते का? शेतकऱ्यांची सहानुभूती मतात परिवर्तित होते का?? यावर त्यांचे भवितव्य ठरणार आहे. आमची लढत युतीशीच आणि विजय आमचाच असे दावे करीत आहे. त्यांचे दावे, मनसुबे खरे ठरतात का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे

हेही वाचा…माजी राज्यमंत्री परिणय फुके यांच्या वाहनाला अपघात, सीटबेल्ट लावला असल्याने अनर्थ टळला

१९५२ पासूनचे खासदार

१९५२ दोन खासदार होते
आबासाहेब खेडकर
लक्ष्मणराव भटकर ( दोन्ही काँग्रेस).१९५७ ,१९६२, १९६७ शिवराम राणे ,१९७१यादव महाजन ( दोन्ही काँग्रेस), १९७७
दौलत गवई (खोरिपा)
१९८० बाळकृष्ण वासनिक,
१९८४ मुकूल वासनिक (काँग्रेस) १९८९ सुखदेव नंदाजी काळे (भाजप)
१९९१ मुकूल वासनिक (काँग्रेस) १९९६आनंदराव अडसूळ (शिवसेना)
१९९८मुकूल वासनिक (काँग्रेस) १९९९आनंदाराव अडसूळ २००४ आनंदराव अडसूळ ,२००९, २०१४,२०१९ प्रतापराव जाधव (दोन्ही शिवसेना).