महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा होत असतानाच आज एका महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी समयसूचकता दाखवत आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला. या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. वर्षा साखळकर असे महिलेचे नाव असून ती जळगाव जामोद तालुक्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा >>>भंडारा: शेतकऱ्याला हरभऱ्याच्या शेतात निद्रावस्थेत वाघ दिसला, पुढे झाले असे की…

women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
atul londhe
 ‘नाना पटोले यांच्या गाडीवरील हल्ल्याची सखोल चौकशी करा’; पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व निवडणुक आयोगाला पत्र
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Kolhapur Lok Sabha, Hasan Mushrif
कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली

जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावे, कॉफी कॅफे बंद करण्याच्या मागणीसाठी या महिलेने अगोदर निवेदने दिली होती. मात्र, काहीच कारवाई करण्यात न आल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले. गेल्या महिनाभरापासून तामगाव पोलीस ठाण्यासह जिल्हाधिकारी कार्यालयाला ही तक्रारी दिल्या. मात्र कारवाई होत नसल्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे वर्षा साखळकर यांचे म्हणणे आहे.