बुलढाणा: भरधाव टिप्परच्या धडकेत महिला ठार तर  एक महिला  जखमी झाली. आज बुधवारी( दि ८) नांदुराजवळ ही दुर्घटना घडली. नांदुरा येथील  वनिता बोचरे,  सच्चिदानंद बोचरे हे दाम्पत्य आणि गीता श्रीकृष्ण ढगे हे रस्त्यावरून जात असताना (एमएच २८ बीबी. ४१३२ क्रमांकाच्या) टिप्परने त्यांना जबर धडक दिली. त्यामध्ये वनिता  बोचरे  (४५ ) यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा >>> बायकोने दिली थंड भाजी, नवऱ्याने घेतला आत्महत्येचा निर्णय; पोलिसांच्या सतर्कतेमुळे नवऱ्याचे वाचले प्राण

गीता ढगे  जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात बचावलेले सच्चिदानंद बोचरे यांनी नांदुरा पोलिसांना घटनेची माहिती दिली. टिप्पर चालक गजानन रामदास वसतकार (२१ , रा. येरळी, तालुका नांदुरा) याला अटक करण्यात आली आहे. ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे .  दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत मलकापूरजवळच्या तांदूळवाडी पुलाजवळ  बांधकामामुळे एकेरी मार्ग करण्यात आला आहे. या ठिकाणी मालवाहू वाहन (ट्रक) व चारचाकी वाहन वेगात धडकले. यात एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेचा पूर्ण तपशील मिळू शकला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.