Women protest outside hotel Raj Thackeray Allegation cheating MNS local officials ysh 95 | Loksatta

चंद्रपूर : राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेर महिलांची निदर्शने; मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याचा आरोप

मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याचा आरोप करीत अन्यायग्रस्त महिलांनी मनसे नेते राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेर निदर्शने केली.

चंद्रपूर : राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेर महिलांची निदर्शने; मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याचा आरोप
राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेर महिलांची निदर्शने

चंद्रपूर : मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याचा आरोप करीत अन्यायग्रस्त महिलांनी मनसे नेते राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेर निदर्शने केली. कलकाम नावाच्या खासगी कंपनीत पैसे गुंतवणाऱ्यांची १०० कोटी रुपयांनी फसवणूक झाली आहे. या फसवणूक प्रकरणी कंपनी संचालक तथा स्थानिक अधिकारी, अशा सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गट आमने-सामने; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

हेही वाचा >>> किशोर तिवारी यांची शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी; ‘लोकसत्ता’ने प्रकरणाकडे वेधले होते लक्ष

सध्या हा आरोपी जामिनावर सुटला आहे. या कंपनीचे संचालक व अधिकारी आरोपी असतानाही मनसेचे स्थानिक पदाधिकारी त्यांना मदत करीत आहेत. अशा पदाधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, या मागणीसाठी या महिला येथे आल्या. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राज ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत होते. यामुळे एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी महिलांना भेटण्यासाठी वेळ दिली होती, असे महिलांकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-09-2022 at 15:32 IST
Next Story
विजेच्या तारांच्या धक्क्याने सरपंचाचा मृत्यू; परिसरात शोककळा