नागपूर : संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत असताना नागपुरात यशवंत स्टेडियममध्ये योगदीन साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्याला लोकांनी यावेळी योगासन केले. नितीन गडकरी यांनी यावेळी योग केले. ‘हर घर आंगण योग’, ही टॅगलाईन आयुष मंत्रालयाने निश्चित केली असून ‘वसुधैव कुटुंबकमकरिता योग’, ही संकल्पना यावर्षी ठेवण्यात आली आहे.

v shriniwas
भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री व्ही श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, गेल्या चार दिवसांपासून होते आयसीयूत दाखल!
PM Narendra Modi in Nagpur
पंतप्रधान नागपुरात, शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा
Lok Sabha Election 2024 Roadshow of Rahul Gandhi and Priyanka Gandhi in Pune
‘पुण्या’साठी राहुल, प्रियंका गांधी यांचा ‘रोड शो’; शरद पवार, उद्धव ठाकरेंच्याही सभा
On the occasion of Prime Minister Narendra Modi visit to Kanhan Nagpur police force on high alert mode Nagpur
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा: नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट मोड’वर; वाहतुक बदल जाणून घ्या…

हेही वाचा – नागपूर : लकडगंज टिंबर मार्केटमधील सात दुकानांना आग; कोट्यवधींचे नुकसान

यावेळी महापालिका, आरोग्य विभाग, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, एनएसएस, एनसीसी, पोलीस, योग संस्थांशी संबंधित अधिकारी कर्मचारी व योग संस्थांचे योग साधक सहभागी झाले होते. तसेच योगतज्ञ रामभाऊ खांडवे, प्रवीण दटके उपस्थित होते.

हेही वाचा – परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळूनही शिष्यवृत्तीत अडथळे,अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून मुदतवाढीची मागणी

गडकरी म्हणाले, आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, आम्हाला अभिमान आहे की युनोने याबाबत निर्णय घेतला. आज १८० देशांत हा कार्यक्रम होतो आहे. आज पंतप्रधान मोदी युनोच्या कार्यालयात योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहे. योग एक विज्ञान आहे. रोज योग केल्याने आरोग्य चांगले राहते. मी माझ्या व्यक्तिगत जीवनात योग करतो, असेही गडकरी म्हणाले.