वाशीम : महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या नाईक घराण्याविषयी आस्था व प्रेम असणारे अनेक समर्थक आहेत. राज्यात सत्तांतर होताच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत इतरही नेते मंत्री झाले. त्यामुळे नाईक घराण्यातील आमदार इंद्रनील नाईक यांनादेखील मंत्री करून नाईक घराण्याला न्याय द्यावा, अशी मागणी मनोरा तालुक्यातील शेंदोना येथील तरुणाने स्वतःच्या रक्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एका पत्राद्वारे केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून अजित पवार भाजपा शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत नाईक घराण्यातील पुसद मतदारसंघाचे आमदार इंद्रनील मनोहर नाईक हेसुद्धा सहभागी झाले आहेत. आमदार इंद्रनील नाईक यांचे मोठे वडील माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी वाशीम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.

हेही वाचा – कायापालट! महापुरुषांशी नाते सांगणाऱ्या तेरा गावांतील शाळांना लाभणार नवे रूप, कोट्यवधीची तरतूद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक व माजी मंत्री मनोहरराव नाईक यांनी राज्याच्या विकासामध्ये आपला मोलाचा वाटा उचललेला असल्याने नाईक घराण्याच्या चौथ्या पिढीतील आमदार इंद्रनील नाईक यांना मंत्री करून नाईक घराण्याचा सन्मान करावा, अशी मागणी निशांत राठोड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वतःच्या रक्ताने लिहलेल्या पत्राद्वारे केली असून सोशल मीडियावर ते पत्र प्रसारीत केले असून जिल्ह्यात हा विषय कुतूहलाने चर्चिल्या जात आहे.