नाशिक : करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरणाचा पर्याय खुला झाल्याने नागरीकांचा प्रतिसाद लाभत असला तरी लसींचा तुटवडा भासू लागला आहे. गुरुवारी लसी उपलब्ध झाल्या असल्या तरी त्या लसीकरण के ंद्रावर पोहोचल्या नसल्याने शहर परिसरात गोंधळाची परिस्थिती होती. गुरुवारपासूनच ४५ वर्षांपुढील सर्वाना लस देण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी लस तुटवडय़ामुळे नियोजन कोसळले.

करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने संसर्ग टाळण्यासाठी लसीकरणाकडे कल वाढत आहे. लसीकरणाच्या पूर्वसंध्येलाच जिल्हा परिसरातील लसींचा साठा संपला होता. याविषयी नागरिकांना माहिती नसल्याने शहर परिसरातील करोना केंद्रावर गुरूवारी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयातही लस साठा संपला होता. ७० ते ८० जणांना लसीकरण करता येईल, इतकाच साठा शिल्लक असल्याने तेवढय़ा नागरिकांना लसीकरण केंद्रात घेऊन बाहेरील बाजुला लस शिल्लक नसल्याचा फलक लावण्यात आला. दुपारी बाराच्या सुमारास ५० हजार कु प्या उपलब्ध झाल्या. त्या खासगी तसेच महापालिका आरोग्य के ंद्रात वितरित के ल्याने लसीकरण नियमीत सुरू झाल्याचा दावा महापालिके चे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके  यांनी के ला. दुसरीकडे, शहरातील महापालिकेचे २७ तसेच खासगी २० लसीकरण केंद्र अशा ४७ केंद्रापैकी इंदिरा गांधी रुग्णालय, बिटको तसेच एसआयएस  या तीन आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू होते.  अन्य लसीकरण के ंद्रात लसीकरणासाठी नागरीकांची गर्दी झाली असली तरी लस उपलब्ध नसल्याने त्यांना परत फिरावे लागले.

शहरात ५० हजार कुप्या उपलब्ध

शहर परिसरात  लसीकरणासाठी ५० हजार कु प्या उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये कोव्हॅक्सिन तसेच कोविशिल्डचा साठा आहे. शुक्र वारपासून लसीकरण नियमितपणे होईल.

– डॉ. बापूसाहेब नागरगोजे (आरोग्य अधिकारी, महापालिका)