दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानची मोहीम; कार्यकत्यांतर्फे बी रोपणही
यंदाच्या तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी नैसर्गिक पाण्याचे स्रोत, इतिहासकालीन तळी यासह अन्य पर्यायांचा शोध घेतला जात असून त्याअंतर्गत येथील दुर्ग संर्वधन प्रतिष्ठानच्या वतीने मनमाडजवळील शिवकालीन अंकाई किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत किल्ल्यावरील पाच तळी स्वच्छ करण्यात आली. या तळ्यांमध्ये असलेल्या पाण्याचा उपयोग पर्यटकांसह इतर प्राण्यांनाही करता येणे शक्य आहे. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी वन्यजीव संपदेचाही अभ्यास केला.
सातमाळा रांगेतील येवला-मनमाड रस्त्यावरील ३२०० फूट उंचीवरील जैव विविधतेने नटलेल्या आणि इतिहासाची साक्ष देणारा अंकाई किल्ला पर्यटक आणि दुर्गप्रेमींचे आकर्षण राहिला आहे.
किल्ल्यावर पाणीटंचाई जाणवत असल्याने वानरांची फौज परिसरातील गावांमध्ये पाण्याच्या शोधात जात असते. किल्ल्यावरील तळी स्वच्छ केल्यास त्याचा फायदा सर्वाना होईल हे लक्षात घेत दुर्ग प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तळ्यांची स्वच्छता केली. पावसाळ्यात वन विभागाने वृक्षारोपण केल्यास किल्ला हिरवागार राहू शकेल.
प्रतिष्ठानतर्फे किल्ल्यावर बी रोपणही करण्यात आले. प्रतिष्ठानच्या या मोहिमेत अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, पक्षीप्रेमी भीमराव राजोळे, सागर बनकर यांसह इतर कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

पर्यटकांकडून अस्वच्छता
किल्ल्यावर १० ते १५ तळी असून त्यापैकी अनेक तळी कोरडी पडली आहेत. काही तळ्यांमध्ये पर्यटकांनी कचरा टाकल्याने ती अस्वच्छ झाली असून काही तळी तर पालापाचोळ्यामुळे दिसेनाशी झाली आहेत. किल्ल्यावर दहा लेणी असून त्यातील कोरीव काम अप्रतिम आहे. या लेणींच्या संवर्धनासाठी पुरातत्व खात्याने लक्ष दिल्यास इतिहासाचे अन्य पैलु अभ्यासता येणे शक्य आहे. किल्ल्यावर अगस्त ऋषींचे मंदिर आहे. या ठिकाणी मोठे पीरबाबा म्हणून स्थान असून निजामाच्या काळात येथे उरूस होत असल्याचा उल्लेख आहे. प्रशस्त प्रवेशद्वार, बुरूज, भव्य तटबंदी, भग्नावस्थेतील वाडे आजही बघावयास मिळतात. किल्ल्यावर देवगिरीच्या यादवांची राजवट होती. समुद्रकिनाऱ्यावरील गुजरात, दीव, दमण येथील बंदरातून होणाऱ्या आयात-निर्यातीच्या व्यापार मार्गावर हा किल्ला होता. या किल्ल्यावरील दारूगोळा, बंदुका ब्रिटिशांनी पळविल्या. १२०० पौंडाचा रोकड खजिना, दोन हजार पौंड किल्ल्यावरील सामान विकून ब्रिटिशांना मिळाल्याची नोंद पाहावयास मिळते. किल्ल्याच्या गुहांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वटवाघूळ आढळतात.

Sangli, Citizens Rescue Crocodile, Hand Over to Forest Department, crocodile in sangli, crocodile in human area, crocodile in sangli, Rescue crocodile, crocodile Rescue,
सांगली : नागरी वस्तीत आलेल्या मगरीची नैसर्गिक अधिवासात पाठवणी
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी